सातारा

काेराेनाबाधित रुग्णामागे दिवसाला इतके रुपये खर्च हाेताहेत, साताऱ्याला 13 कोटींची गरज

उमेश बांबरे

सातारा : कोरोनासाठी आतापर्यंत चार कोटी रुपये खर्च झाले असून, आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने आणखी 13 कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे. सध्या कोरोनाबाधित "आयसीयू'मधील रुग्णावर दिवसाला दहा हजार रुपये खर्च होतो आहे. तर साध्या वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर पाच हजार रुपये खर्च होत आहेत. तसेच सौम्य व लक्षणेविरहित असलेल्या रुग्णावर मात्र 500 ते हजार रुपये खर्च होत आहे.
म्हारवंडचे माळीण व्हायची प्रशासनाला प्रतीक्षा?
 

कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात जुलैमध्ये वाढला आहे. सध्या जिल्ह्यात बाधितांची संख्या 1845 झाली असून, 706 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. दररोज 60 ते 90 च्या दरम्यान बाधित आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढू लागलेली आहे. आता खासगी रुग्णालये अधिगृहित करून या क्षमतेपेक्षा जास्त संख्येने सापडणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोना निवारणासाठी शासनाने प्रारंभी जिल्ह्याला चार कोटी निधी उपलब्ध केलेला होता. त्यापैकी साडेतीन कोटी रुपये तीन ते चार महिन्यांत खर्च झालेले आहेत. यातून कोरोना केअर सेंटर तसेच बाधित रुग्णांवरील उपचारासाठी सर्वाधिक पैसे खर्च झालेले आहेत. सध्या कोरोनाबाधित आयसीयूतील रुग्णावर दिवसाला दहा हजार खर्च होत आहेत. या रुग्णांवर आठ ते 14 दिवस उपचार करून त्यांचे दोन वेळचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना घरी सोडले जात आहे.

Coronavirus : विश्‍वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती

पण, तेथेही काही दिवस होम क्वारंटाइन केले जात आहे. यासोबतच साध्या वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णावर दिवसाकाठी पाच हजार रुपये खर्च होतो. यामध्ये औषधे, ऑक्‍सिजन, इंजेक्‍शन, सलाईन व इतर उपचारांचा समावेश आहे. तर सर्वसाधारण वॉर्ड व कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवलेल्या रुग्णावर 500 ते हजार रुपये खर्च होत आहेत. या सर्व रुग्णाचा जेवण व नाष्ट्याचा खर्च 500 रुपयांपर्यंत जातो.

 'यांच्याशी' झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केला घाेषित 

ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे किंवा संशयित रुग्णांना दोन दिवस रुग्णालयात ठेऊन घेऊन त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्यातील काहींना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, लिव्हर, कॅन्सर किंवा इतर कोणतेही आजार) असतील तर त्याची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये आठ दिवस ठेवले जाते. ज्या संशयितांना कोणतीच लक्षणे नाहीत, पण तो निकट सहवासीत आहे, अशा रुग्णांना होम क्वारंटाइन केले जाते. सध्या रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासनाने यापूर्वी दिलेला निधी कमी पडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी 13 कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. यातून वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यावर सर्वाधिक निधी खर्च केला जाणार आहे. 

सातारा जिल्हा पाेलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी का चढविले पीपीई कीट. त्या काेणाला गेल्या भेटायला, काय म्हणाल्या सविस्तर वाचा

दीड लाख रुपयांपर्यंत खर्चाची परवानगी 

जिल्हा रुग्णालयात तसेच जिल्हा प्रशासनाने अधिगृहित केलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर मोफत उपचार होत आहेत. त्याचा खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून केला जात आहे. साधारण कोरोनासाठी एका रुग्णाला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी खर्च करण्यास परवानगी आहे. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या निधीतूनही कोरोना केअर सेंटर व खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून खर्च केला जात आहे. 

जुगारप्रकरणी पुण्यातील बारा जणांना वाईत अटक; 86 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त

एका रुग्णावरील दिवसाचा खर्च... 

जेवण, नाष्ट्यावर : 250 रुपये 
आयसीयूमध्ये : दहा हजार 
साध्या वॉर्डमध्ये : पाच हजार 
कोरोना केअर सेंटरमध्ये : 500 ते हजार 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT