सातारा

गुड न्यूज : सातारा जिल्हा अंशतः अनलाॅक; व्यावसायिकांना दिलासा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्हा 17 ते 26 जूलैपर्यंत लॉकडाउन करण्यात आला हाेता. आज (रविवार, ता.26) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हा अंशतः अनलाॅक केला आहे. नव्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दाेन या वेळेतच सुरू ठेवाण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, नागरीकांनी विनाकारण बाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात लाॅकडाउन करण्यात आले हाेते. त्याची मुदत आज (रविवार) संपली. उद्यापासून साेमवार (ता.27) सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानांबाबत तेथील प्रांताधिकारी निर्णय घेतील असे नव्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधु,वर, वधु-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहिण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.

तासभर खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याशी चर्चा केली

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सेना, राष्ट्रवादीच्या दोन गटांत सातारा जिल्ह्यात हाणामारी; 11 जणांना अटक 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT