satara District Bank Election
satara District Bank Election sakal
सातारा

खटावमध्ये सोसायट्यांत निवडणुकीचा ज्वर!

आयाज मुल्ला

वडूज : खटाव तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका सध्‍या सुरू आहेत. या निवडणुकीवर जिल्हा बँक निवडणुकीचा ‘इफेक्ट’ मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बिनविरोध होणाऱ्या अनेक सोसायट्यासुध्दा निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. खटाव तालुक्यात १०३ विकास सेवा सोसायट्या कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी अनेक सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आला. मात्र, कोरोना संसर्गामुळे या सोसायट्यांना मुदतवाढ मिळाली. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाल्यानंतर या सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू झाला आहे.

आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीत काही मोजक्याच सोसायट्या बिनविरोध झाल्या आहेत. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा इफेक्ट सोसायट्यांच्या निवडणुकीवर झाल्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक लागली आहे. निवडणूक झालेल्या बहुतांशी सोसायट्यांच्या ठिकाणी दुरंगी व चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून आले. तर तालुक्यातील ३९ विकास सेवा सोसायट्यांच्या प्रारूप मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम पार पडला आहे. पैकी १५ सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आणि १२ सोसायटींच्या हरकतींचा कार्यक्रम पार पडला आहे. तर १२ सोसायट्यांच्या हरकती उद्या (ता. दोन मार्च) अखेर घेता येणार आहेत. सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने गावोगावी कार्यकर्ते सतर्क झाले असून, काही झाले तरी सोसायटी आपल्याच ताब्यात कशी राहील, यासाठी कसोशीने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील महत्त्‍वाच्या असणाऱ्या बुध, दरूज, जयराम स्वामींचे वडगाव, गोरेगाव (वांगी), नढवळ, ललगुण, नागनाथवाडी आदी ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर दुसऱ्या टप्प्यातील बहुतांशी सोसायट्यांच्या निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी वरून मतदारसंघातून माजी आमदार प्रभाकर घार्गे व राष्ट्रवादीचे उमेदवार नंदकुमार मोरे यांच्यात समोरासमोर लढत झाली होती. त्यामध्ये श्री. घार्गे यांनी विजय मिळविला. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ठरावधारक मतदारांचा भाव चांगलाच वधारला होता. निवडणुकीपूर्वी १५ दिवस अगोदर मतदारही सहलीवर होते. या निवडणुकीत मोठे अर्थकारण झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती. परिणामी गावोगावी कार्यकर्ते सोसायटीवर आपलेच वर्चस्व मिळविण्यासाठी सतर्क झाले आहेत. शिवाय तालुकापातळीवरील नेतेमंडळीदेखील सोसायटी निवडणुकीत लक्ष घालू लागली आहेत. सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे.

कार्यकर्त्यांतही संचारला ‘इलेक्शन फिव्हर’

खटाव तालुक्यातील बहुतांशी सोसायट्यांना बिनविरोध निवडीची परंपरा आहे. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत अनेक बिनविरोध होणाऱ्या सोसायट्यांमध्ये निवडणुकीचा ज्वर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गावोगावच्या कार्यकर्त्यांतही चांगलाच ‘इलेक्शन फिव्हर’ संचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT