Shashikant Shinde esakal
सातारा

'मोठं कारस्थान', शशिकांत शिंदेंची पराभवानंतर प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्यात निकालानंतर शशिकांत शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाली. या प्रकारावर शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली असून कार्यकर्त्यांनी केलं ते योग्य नाही असं म्हटलं.

सातारा - जिल्हा बँकेच्या निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. जावळी सोसायटी मतदारसंघात विजयी ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. तसंच या निकालानंतर शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना घडली. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात हे केलं, हे योग्य नाही. मी सर्वांची माफी मागतो असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.

निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली.

मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मला ज्यांनी उभा केलं त्या पक्षाच्या कार्यालयाविरोधात जी भूमिका घेतलीय ती योग्य नाही. मी पवार साहेबांसह सर्वांची माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर मी माफी मागतो. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे असं नाही होणार, मी पक्षासाठी जीव देईन, माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ नये

निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनी श्री. शिंदेना पराभूत करण्यासाठी अपक्ष उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना ताकद दिल्याचा आरोप करून शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व अपक्ष ज्ञानदेव रांजणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रांजणे कट्टर समर्थक आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनल मधील काही नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे.

पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीबाबत प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी अशी भूमिका का घेतली माहिती नाही, एका मताने पराभव झाला आहे. माझ्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले पण मला यश आलं नाही. यामागे मोठं कारस्थान आहे. याबद्दल लवकरच सविस्तर बोलेन असंही त्यांनी म्हटलं.

निवडणुकीतील पराभवाबद्दल प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचं म्हटलं. तसंच माझा गाफिलपणा मला नडला, माझा पराभव मला मान्य आहे. मी आज काही बोलणार नाही. विधानसभेतही पराभव झाला आणि जिल्हा बँकेतही पराभव झाला यावर आज काही बोलणार नाही, २५ तारखेनंतर सविस्तर बोलणार असल्याचंही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

दगडफेक कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात हे कृत्य केलं. त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो, पक्षाच्या विरोधात असं करणं मूर्खपणा आहे. ज्या पक्षाचा सदैव सैनिक म्हणून काम करणार आहे त्या पक्षाला गालबोट लावण्याचं काम करू नये आणि तसं केल्यास मी सहन करणार नाही अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT