balasaheb patil sakal media
सातारा

शेतकरी हितासाठी जिल्हा बॅंक निवडणुकीत; पालकमंत्री बाळासाहेब पाटील

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उंब्रजमध्ये मेळावा

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज : शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. मतदारांनी बॅंकेच्या निवडणुकीला सांघिकपणे सामोरे जावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी सभापती देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, चंद्रकांत जाधव, सभापती प्रणव ताटे, राजाभाऊ पाटील-उंडाळकर, राजेश पाटील-वाठारकर, अशोकराव पाटील-पार्लेकर, संगीता साळुंखे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बॅंक निवडणुकीचा अर्ज दाखल केला. प्रथेप्रमाणे तीर्थक्षेत्र पाल येथे खंडोबाचे दर्शन घेतले. सातारा जिल्हा बँक ही ज्‍येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून निर्माण झाली. किसन वीर यांच्यासह अनेकांचे योगदान राहिले आहे. आपल्या पाठीशी मतदार असल्याने मतदारसंघातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँक निवडणुकीचे चित्र दहा तारखेला स्पष्ट होईल. दरम्यानच्या काळात काही लोक येतील, पॅनेलची भूमिका मांडतील. मात्र, काही लोक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतील."

"तालुक्यातील सर्व मतदार व सोसायटी मतदारांशी चर्चा झाली आहे. २० ते २५ वर्षे जबाबदारीने सहकारात काम केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर आहे. कुणाचीही आजपर्यंत अडवणूक केली नाही, त्रास दिलेला नाही. भविष्यात हीच भूमिका राहील. जिल्हा बॅंक निवडणुकीत निर्माण झालेल्या शरद पवार यांच्या विचाराच्या पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. मतदारांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून सांघिकपणे निवडणुकीला सामोरे जावे. टीका-टिप्पणी झाल्यास जशास तसे उत्तर देऊ.’’ माणिकराव पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT