satara sakal
सातारा

सातारा : छत्रपती संभाजी स्मारकास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

कऱ्हाडात लवकरच होणार भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक येथील भेदा चौकात उभारण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र स्मारक समितीला देण्यात आले आहे. स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

स्मारक समितीचे अध्यक्ष जयंत पाटील, सचिव रणजित पाटील, सदस्य अॅड. दीपक थोरात, प्रतापराव साळुंखे, प्रताप इंगवले, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, भूषण जगताप यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. समितीच्या वतीने स्मारकासाठी पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने १६ फेब्रुवारी २०२२ ठराव करून भेदा चौकातील जागा देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर गेले सात महिने विविध शासकीय विभागांच्या परवानग्या मिळवल्या आहेत.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी १६ सप्टेंबरला येथील नियोजित स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिलेली आहे. याबाबतचे पत्र स्मारक समितीला देण्यात आले. स्मारकास मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. हे स्मारक महाराष्ट्रातील भव्य स्मारक होईल. शहराच्या वैभवातही भर पडेल. स्मारक ५५ फुटांचे असून, यात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, संग्रहालय, स्पर्धा परीक्षार्थींसाठी अभ्यासिका, ग्रंथालय असेल. सुमारे सात कोटींचा हा प्रकल्प असून, तीन टप्प्यांत या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT