निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून आणले; रांजणे sakal media
सातारा

निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून आणले; रांजणे

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून आणले आहे

संदीप गाडवे

केळघर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून आणले आहे. या विश्वासाला पात्र राहून जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून जिल्हा बँकेच्या लोकोपयोगी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रांजणे यांचा काळेश्वरी वरोशी विकास सेवा सोसायटीच्या वतीने केळघर येथील सोसायटीच्या कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य विजय सुतार, ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, केळघर सोसायटीचे अध्यक्ष बबन बेलोशे, सोसायटी संचालक हरिभाऊ शेलार, बंडोपंत ओंबळे, कोंडीबा कासुर्डे, सुरेश कासुर्डे, बाजीराव कासुर्डे, दिलीप पाटील, सरपंच विलास शिर्के, शिवराम गोळे अंकुश बेलोशे, चंद्रकांत ओंबळे, प्रकाश ओंबळे, शिवराम बेलोशे, संतोष कासुर्डे आदींची उपस्थिती होती.

रांजणे म्हणाले, जावळी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सहकाराचे नाव अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न केले जातील. विकास सेवा सोसायट्या ह्या ग्रामीण भागातील अर्थकारण चालवतात. या सोसायट्या अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करू. केळघर विभागाला जिल्हा बँकेच्या माध्यमातून संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहू.

मोहनराव कासुर्डे म्हणाले, संघर्षातून रांजणे यांनी हा विजय मिळवून इतिहास निर्माण केला आहे. तालुक्यातील सहकार चळवळीला त्यांनी उभारी देऊन विकास सेवा सोसायट्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा बँकेचे संचालक म्हणून रांजणे यांनी काम करावे. प्रारंभी वरोशी विकास सेवा सोसायटीच्या वतीने रांजणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वरोशी सोसायटीचे संचालक,सभासद उपस्थित होते.विलास शिर्के यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT