सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शेतकरी व ग्राहकांसाठी आवाहन

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. या कालावधीत 31 जुलैपर्यंत तातडीचे काम असेल तरच जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश मिळेल. याबाबत सर्वांनी बॅंकेस सहकार्य करावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.
मायलेकीच काेराेना बाधित झाल्याने या गावात चिंता 
 
आमदार भोसले व डॉ. सरकाळे यांनी म्हटले की, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या नियमावलीचे पालन करणे व सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शेतकरी व ग्राहकांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घ्यावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी सभासदांनी आपली कर्ज प्रकरणे स्वहस्ते बॅंकेच्या मुख्य कार्यालयात घेऊन न येता बॅंकेच्या संबंधित शाखेमार्फत मुख्यालयास पाठवून द्यावीत.

मत व मनभेदाच्या भिंती तोडून वृक्षसंवर्धन, निसर्गाचे संतुलन

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अनुदानाची साधारणपणे साडेतीन लाख शेतकरी व ग्राहकांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. पीककर्ज व्याज परतावा रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. या सर्व बॅंकिंग व्यवहारासाठी बॅंकेच्या शाखांमध्ये शेतकरी व ग्राहकांची गर्दी होणार असल्याने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बॅंकेने आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या आहेत, असेही डॉ. सरकाळे यांनी स्पष्ट केले. 

संपादन - संजय शिंदे

शेतकऱ्यांची हाक... कुणी भाजी घेता का भाजी! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT