सातारा

दे त्यांना काय पाहिजे ते! कार्यकर्त्यांसाठी पुढा-यांचे ढाब्यावर वाढले फाेन

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : घरोघरी मार्गशीर्ष महिन्यात केली जाणारी व्रतवैकल्ये व जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा थर्टी फस्टपूर्वीच बहुतांश हॉटेलवर खवैय्यांचा राबता वाढला आहे. लॉकडाउनमुळे अस्वस्थ झालेले लोक आवडत्या ड्रिंक्‍स व डिशवर ताव मारून धमाल करीत असल्याचे चित्र आहे.
 
अलीकडच्या काळात थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे फॅड बोकाळले आहे. शहरी लोकांप्रमाणे ग्रामीण भागातही वर्षानुवर्षे थर्टी फर्स्टचा ज्वर वाढतच चालला आहे. त्यानिमित्त ओल्या सुक्‍या पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी ढाबे, हॉटेल्ससह ठिकठिकाणच्या फार्महाउसचे बुकिंग करण्यात येत आहे. नेमके कोठे जायचे, किती जण जायचे, कसे जायचे, खायचे काय, प्यायचे काय, एकट्याने जायचे की विथ फॅमिली? अशा अनेक बाबींचे नियोजन करण्यात येत आहे. सोयी-सुविधांच्या दृष्टीने परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, ढाब्यांची सर्वांगीण माहिती घेण्यात येत आहे. केवळ शाकाहारी चांगले जेवण कुठे मिळते, मांसाहारी जेवणासाठी कोणते हॉटेल वा ढाबा प्रसिद्ध आहे. कुटुंबासह गेले तर सुरक्षितता आहे का, याबाबतही विचार केला जात आहे.

मांढरदेव दरीतील मृतदेह रत्नागिरीच्या युवकाचा; खूनाचा पत्नीचा दावा
 
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून गावोगावी बैठका, मीटिंग, गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. कुणा नाराजांची मनधरणी करण्यात येत हाेती. कुणाला उमेदवारीसाठी गळ घातली जात हाेती. तर कोणास उमेदवारी माघार घेण्यास सांगितले जात हाेते . काही प्रमुख कार्यकर्त्यांची मने वळवण्यासाठी ठराविक लोकांच्या पार्टीचा बेत केला जात आहे. काही जण तर चोरी छुपे राजकीय हालचाली व चर्चा करण्यासाठी हॉटेल वा ढाब्यावर एकत्र येत आहेत. परिणामी, थर्टी फर्स्टच्या आधीच ठिकठिकाणचे ढाबे व हॉटेल गर्दीने फुलून गेलेले दृष्टीस येत आहेत. दरम्यान, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, ढाब्याची रंगरंगोटी करण्यात येत आहे. मंडप, कमानी, दिव्यांची आरास अशी सजावट करण्यात येत आहे. 

कॉंग्रेस करणार बांगलादेश मुक्ती संग्रामाची ५० वर्षे साजरी; ए. के. अँटनींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

चमचमीत खाणारांची हॉटेल, ढाब्यांवर गर्दी 

मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने घरोघरी महिलांचे वैभव लक्ष्मी व्रत सुरू आहे. त्यामुळे पूर्ण मार्गशीर्ष महिना घरी मांसाहार वर्ज्य आहे. आधीच लॉकडाउनमुळे खवैय्यांना जिभेचे चोचले पुरवता आले नाहीत. त्यामुळे अस्वस्थ व बाहेरचे चमचमीत खाण्यास अधीर झालेले अनेक जण सध्या हॉटेल व ढाब्यांवर गर्दी करताना दृष्टीस येत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT