सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयाची इमारत Sakal
सातारा

सातारा : जिल्हा रुग्णालय लवकरच पेपरलेस

शासनाचे निर्देश; ४७ संगणकांची खरेदी, टप्प्याटप्प्याने होणार काम

प्रवीण जाधव

सातारा - जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांचे संगणकीकरण करण्याबरोबरच त्याद्वारे सर्व विभाग एकत्रित जोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी उपलब्ध झालेल्या ५५ लाखांच्या निधीतून ४७ संगणकांची खरेदी करण्यात आली आहे. इंटरनेट कनेक्टीव्‍हिटीचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील सर्व कामकाज टप्‍प्याटप्‍प्याने पेपरलेस करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. रुग्णालयातील बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, डायलिसिससह विविध विभागांचे कामकाज कादावरच चालते. काही दिवसांपूर्वी केसपेपर विभागात तीन संगणकांसह अन्य यंत्रणा उभारण्यात आली. त्यातून नागरिकांना संगणकीकृत केसपेपर देण्यास सुरवात झाली होती. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला केसपेपर क्रमांक मिळत होता. परंतु, प्रिंटर व काही संगणक बंद पडल्यामुळे केसपेपर पुन्हा ऑफलाइन झाले.

शासकीय योजनेनुसार रुग्णालयातील सर्व विभागांचे संगणकीकरण करून ते एकमेकांना जोडण्याचा प्रकल्प राबविण्याचे निर्देश आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून आवश्यक असणारी साधनसामुग्री खरेदी केली जाणार आहे. या उपक्रमात रुग्णालयातील केसपेपर विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, डायलिसिस विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन अशा सर्व विभागांचे संगणकीकरण करून ते एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यानुसार रुग्णाने केसपेपर विभागात नोंदणी केल्यास ती सर्व विभागांमध्ये दिसणार आहे. त्यानंतर रुग्ण बाह्यरुग्ण विभागात गेल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्याला असणारा आजार व औषधोपचाराची माहिती संबंधित रुग्णाच्या संगणकावरील केसपेपर क्रमांकावर लिहिली जाईल. वैद्यकीय अधिकाऱ्याने सुचविल्यानुसार त्या-त्या विभागात गेल्यावर रुग्णाच्या केसपेपर क्रमांकावरून संबंधित विभागातील तंत्रज्ञानाला वैद्यकीय अधिकाऱ्याने सुचविलेल्या तपासण्या संगणकावर दिसणार आहेत. त्यानुसार त्या तपासण्या करून त्याचे अहवाल रुग्णाच्या क्रमांकानुसार संगणकावरच भरले जाणार आहे. औषध विभागातही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली औषधे संगणकावर पाहून संबंधित रुग्णाला दिली जातील. आंतररुग्ण विभागातही अशाच प्रकारे रुग्णाची माहिती, औषधे व आवश्यक तपासण्यांची माहिती संगणकावर भरली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ४७ संगणकांची खरेदी केली आहे. तसेच या सर्व संगणकांना एकत्र जोडण्यासाठी इंटरनेट कनेक्टीव्‍हिटीचे कामही सुरू आहे. अशा पद्धतीने रुग्णालयाचे पूर्ण कामकाज पेपरलेस करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व रुग्णांच्या माहितीची नोंद कायमस्वरूपी रुग्णालयात संगणकावर उपलब्ध राहणार आहे. त्याचा रुग्णाच्या उपचारासाठी फायदा होणार आहे.

रुग्णालयातील सर्व विभाग संगणकीकृत करून परस्परांना जोडले जातील. त्यामुळे रुग्णाची सर्व माहिती प्रत्येक विभागात उपलब्ध होईल. त्यातून रुग्णालयाचे कामकाज टप्‍प्याटप्‍प्याने पेपरलेस करण्यात येणार आहे. रुग्णांचा डाटा एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या उपचारात नक्कीच मदत होईल.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT