सातारा

सातारा जिल्ह्यातील बाजारपेठ उद्यापासून खूली, दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरावे

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जाहीर केलेला लॉकडाउन जिल्हाधिकाऱ्यांनी उठवला. शनिवारपासून (ता. एक) 31 ऑगस्ट या कालवधीत सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सांघिक नसलेल्या आउटडोअर क्रीडा प्रकारांनाही परवानगी देण्यात आली आहे.
अखेर 'या' 14 गावांत होणार जमिन खरेदी-विक्री
 
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागल्याने 17 जुलैपासून जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाउन जाहीर केले होते. 22 जुलैपर्यंत सर्व दुकानांना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर केवळ अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना परवागनी दिली होती. 27 जुलैपर्यंतचा लॉकडाउन जिल्हाधिकाऱ्यांनी 31 जुलैपर्यंत वाढविला. त्यामुळे एक ऑगस्टपासून लॉकडाउन वाढणार, की त्यात शिथिलता मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. गुरुवारी (ता.30) रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी अन"लॉक'चे आदेश काढून सर्व व्यावसायिक व नागरिकांना दिलासा दिला.

 कऱ्हाडला कोरोनाबाधितांवर घरच्या घरीच उपचार!

आठ किलोमीटर पायपीट करणाऱ्या लक्ष्मीचा शाळेत पहिला नंबर; सैन्यात जाण्याचे स्वप्न

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार शनिवारपासून (ता. 1) 31 ऑगस्टपर्यंत सर्व मार्केट, दुकाने, मॉल व व्यापारी संकुलातील आस्थापनांना सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यातील मॉल व व्यापारी संकुलातील दुकानांनाही परवानगी पाच ऑगस्टपासून देण्यात आली आहे. त्यामध्ये असलेल्या चित्रपटगृहांबरोबरच आउटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब अशा खेळांना योग्य सुरक्षिततेचे पालन करून पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोल पंप पूर्णवेळ सुरू ठेवता येतील.

त्याचबरोबर ब्युटीपार्लर, स्पा, केश कर्तनालये, 20 व्यक्तींच्या उपस्थित लग्न समारंभ, सेतू, महा-ई-सेवा व आधार केंद्र, 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस अशा यापूर्वी सुरू असलेल्या सवलतीही सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. जिल्हाबाहेर जाण्यास मात्र, यापूर्वीप्रमाणेच बंदी कायम ठेवण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये यापैकी कोणत्याही सवलतींना परवानगी देण्यात आलेली नाही. 

साताऱ्याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर, अखेर 'हा" निर्णय घेतलाच

...हे राहणार सुरू (सकाळी नऊ ते सायंकाळी सात) 

  •  सर्व प्रकारची दुकाने 
  •  जिल्हांतर्गत एसटी सेवा 
  •  पाणीपुरवठा टॅंकर, पेट्रोल, डिझेल पंप, गॅस वितरण 
  •  बॅंका, सहकारी बॅंका, सोसायटी कार्यालये 
  •  शासकीय कार्यालये, सेतू केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे 
  •  केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, सलून 
  •  भाजीविक्री, दूध वितरण 
  •  चिकन, मटण, मासे, अंडी विक्री 
  •  वर्तमानपत्रे व वितरण व्यवस्था 
  •  वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने 
  •  दुचाकीवर दोघे, रिक्षात तिघे, चारचाकीत चौघांना प्रवासास मुभा 

    लई भारी...साताऱ्यातील पठ्ठ्याने पाणीपुरी विकून मिळविले दहावीत यश

...हे राहणार बंद 

  •  चित्रपटगृहे, जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव 
  •  आंतरराज्य प्रवास वाहतूक 
  •  सामाजिक व राजकीय मेळावे 
  •  मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रम 
  •  सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे 
  •  हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस 
  •  शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT