NCP Sharad Pawar Esakal
सातारा

Sharad Pawar : 'आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आलीये'

महाराष्ट्रात सध्या तोडफोड, फूट पाडा, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करा, असे भयानक प्रकार सुरू आहेत.

किरण बोळे

या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारणेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे.

फलटण शहर : महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या विचारांचा वारसा आहे. जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण अशा विभूतींच्या विचारांचा वारसा आहे. तोच वारसा पुढे घेऊन वाटचाल करणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच पाठीशी फलटण तालुक्यातील जनता व जिल्हा ठामपणे राहील, असा विश्वास ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे (Subhash Shinde) यांनी व्यक्त केला.

येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष बांधणी, तालुका कार्यकारिणी व विविध समित्यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणले, ‘‘महाराष्ट्रात सध्या तोडफोड, फूट पाडा, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करा, असे भयानक प्रकार सुरू आहेत; परंतु ही महाराष्ट्राची व जिल्ह्याची संस्कृती नाही. या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारणेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे. विपरित राजकीय परिस्थितीतही वयाच्या ८२ व्या वर्षी तरुणाला लाजवेल, अशा पद्धतीने पवार यांचे काम सुरू आहे.

Phaltan NCP Melava

लोकप्रतिनिधी दुसरीकडे असले तरी सर्वसामान्य जनता मात्र शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र सर्वत्र आहे. फलटण तालुकाही त्यास अपवाद नाही. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले नीरा-देवघर, धोम-बलकवडी, रेल्वे व औद्योगिक प्रकल्प, कारखानदारीमध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्याची जाणीव सर्वसामान्य जनतेला आहे.’’ यावेळी रवींद्र बर्गे, प्रा. सुधीर इंगळे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, तानाजी जगताप आदींसह शहर व तालुक्यातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

जनता की नेता मोठा दाखविण्याची वेळ

जनतेमुळे नेते निर्माण होतात. त्यामुळे आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आली असून, तालुक्यातील जनता शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहून ते निश्चितपणे दाखवून देईल, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT