patan 
सातारा

कुणी रानमेवा घेता का रानमेवा...

सकाळ वृत्तसेवा

पाटण (जि. सातारा) ः उन्हाळ्यात सर्वांना हवाहवासा असणारा व बालचमूंपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडीच्या रानमेव्याची चव कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी चाखायला मिळाली नाही. मुबलक प्रमाणात असतानाही या हंगामात रानमेवा जागेवरच राहिल्याने डोंगरकपारीतील गोरगरिबांचा हक्काचा रोजगारही गेला. पावसाळा सुरू झाला तरी खरेदीदार नसल्याने कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर चार पैसे मिळतील, या आशेवर दिवसभर विक्रीसाठी स्थानिक बसत असल्याचे चित्र दिसत आहे. 

पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रानमेवा उपलब्ध होतो. करवंदे, जांभळे, तोरणे, आळू, कोकम, आंबा व फणस ही कायम आठवणीत रहाणारी व वर्षातून दोन महिनेच उपलब्ध असणारी फळे पाटणचे खास वैशिष्ट्य आहे. मार्च संपला की आळू व करवंदे ही कऱ्हाड-चिपळूण महामार्ग व पाटण तालुक्‍यातील बाजारपेठांत दाखल होतात. तालुक्‍याचा पश्‍चिम डोंगररांगांत रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. त्यानंतर तोरणे, जांभळे व शेवटी आंबा आणि फणस असा दोन ते तीन महिन्यांचा रानमेव्याचा बहर चाखायला मिळतो. 

रानमेव्याने करवंदे, जांभळे, आंबा व फणसाची झाडे लगडलेली पाहावयास मिळतात. यावर्षी रानमेव्याला चांगलाच बहर आला होता. मात्र, रानमेव्याचा हंगाम सुरू होण्यास आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाउनचे भूत उभे राहिले. दोन महिन्यांहून जास्त काळ कऱ्हाड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. राज्यभरातून तळ कोकणात जाणारे पर्यटक थांबले. त्यामुळे विक्रीसाठी आणलेला रानमेवा पुन्हा घरी परत घेऊन जाण्याची वेळ स्थानिक गोरगरिबांवर आली आहे. 

दोन महिने डोंगररांगांतील गोरगरिबांना रानमेव्यामुळे विना भांडवल रोजगार उपलब्ध होतो. कोरोनाने तोही हिरावून नेला. मात्र, स्थानिक कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर पुन्हा वाहतूक सुरू होईल व शेवटच्या चार दिवसांत चार पैसे मिळतील, या आशेने काट्याकुट्यातून गोळा केलेला रानमेवा घेऊन विक्रीसाठी लोक बसत असले तरी वाहतूकच बंद असल्याने सायंकाळी त्यांचा भ्रमनिरास होत आहे. 


रानमेवा ः करवंद, जांभूळ, तोरण, आळू, कोकम, आंबा व फणस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT