लोणंद (जि. सातारा) : लोणंद इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वाती शहा यांची, तर सचिवपदी शिल्पा शहा आणि खजिनदारपदी डॉ. संगीता बुटियानी यांची नुकतीच निवड झाली.
लोणंद इनरव्हील क्लबच्या येथे नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी माजी अध्यक्षा डॉ. जयश्री यादव, सदस्या सुनीता खंदारे, ममता अरोरा, डॉ. सरिता वर्धमाने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम "गुगल मीट'वर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन टेक्नॉलॉजी वापरून प्रथमच अशा पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कामी सायल शहा, अपूर्व बुटियानी व प्रा. दुरगुडे यांचे सहकार्य लाभले. आयएसओ म्हणून क्षमा शहा यांची निवड झाली. शिल्पा शहा यांनी विषयांचे वाचन केले.
सुनीता खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष डॉ. जयश्री यादव यांनी मागील वर्षातील इनरव्हील क्लबच्या कामांचा आढावा घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. स्वाती शहा म्हणाल्या, ""अनुराधा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे कोरोना योध्दा डॉक्टर, नर्सेस, आशाताई, सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी, तसेच स्वच्छता अभियान, अनाथ व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काम करण्याचा तसेच भैरोबा डोंगरावर वनराई फुलवण्याचा व त्यासाठी तेथे पाण्याची सोय करण्याचा मानस आहे.''
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.