Karhad Municipality satara sakal
सातारा

सातारा : गटारासाठीच्या निधीचा होईना ‘निचरा’

पृथ्वीराज चव्हाणांकडून पाच कोटी मंजूर; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडूनही राजकारण

सचिन शिंदे / जालिंदर सत्रे

कऱ्हाड : कोरोनामुळे नगरपालिकेच्या आर्थिक महसुलात घट झाली होती. कामांसाठी निधी नसतानाच्या काळात पावसाळ्यात साचून राहणाऱ्या पाणी निचऱ्यासाठी बंदिस्त गटार बांधणीला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच कोटींचा निधी आणला. तो निधी अद्यापही वापराविना पडून आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये हा निधी वर्ग झाला असतानाही डिसेंबरपर्यंत सत्ताधाऱ्यांचे राजकारण, तर डिसेंबरनंतर प्रशासक असूनही पालिका अधिकाऱ्यांच्या राजकारणाचे या निधीला ग्रहण लागले आहे. राजकाणासह दप्तर दिरंगाईचा फटका शहरालाच बसणार आहे. बंदिस्त गटारांचे काम अपूर्ण राहिल्याने पुन्हा पाणी साचून शहराला लाखोंची नुकसान याही वर्षी सोसावे लागणार आहे.

पावसाळा आला की, शहरातील काही भागात पाणी साचून राहण्याचा प्रकार नित्याचाच होता. कोल्हापूर नाक्यावरून पोपटभाई पेट्रोल पंपासह शहर पोलिस ठाणे व भेदा चौक परिसराचा भाग कंबरेइतक्या पाण्यात असतो. तेथील गटारांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने दरवर्षी नागरिकांची लाखोंची हानी होते. हद्दवाढीतील कार्वे नाका व अन्य भागात पावसाचे साचणारे पाणी घरात शिरते. तेथेही पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने तो धोका दरवर्षी पालिकेला पत्करावाच लागतो.

शहरातील ती स्थिती लक्षात घेऊन त्या भागातील पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेसाठी आमदार चव्हाण यांनी पुढाकार घेतला. पालिका अहवालासह अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा केली. गटारांव्दारे बंधीस्त पाईप लाईन केल्यास साचणारे पाणी निचऱ्यावरील पर्याय निघू शकतो, याची खात्री झाल्यानंतर त्यांनी निधी आणला. त्यातून गटारांची क्षमता वाढवण्याचे अपेक्षीत होते. मात्र, त्यातील काहीच काम झालेले नाही. बंदीस्त पाईप लाईनचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून मंजूर केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाच कोटींची निधी दिला. मात्र, पालिकेत त्यातून कामे करण्याऐवजी राजकारणच जास्त सुरू आहे. त्यामुळे येथे पावसाच्या साचणाऱ्या पाण्यावर निघणारा तोडगा मागे पडला. पालिका अधिकाऱ्यांनीही केलेल्या राजकाणामुळे बंदिस्त गटारांचे काम मागे पडले.

निधी मंजूर होवून नऊ महिने झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यात सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाने निधी पडून राहिला. डिसेंबरपासून प्रशासक येवूनही बंदिस्त गटाराचे काहीच काम झालेले दिसत नाही. राजकीय दबावापोटी पालिका अधिकारी हेतुपुरस्सर तो निधी वापरत नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईचाही फटकाही बसत आहे. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात अटक

Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT