Satara 
सातारा

कोविड स्मशानभूमीमुळे पिण्याचे पाणी दूषित, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : गावातून वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्याशेजारी असलेल्या स्मशानभूमीत होत असलेल्या कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कार व अस्थी, रक्षा विसर्जनामुळे कालव्यातील पिण्याचे पाणी दूषित होत असून, कालव्याशेजारी असलेल्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

येथील रावरामोशी पुलाजवळ कोळकी गावासाठी बांधलेल्या स्मशानभूमीत सध्या फलटण, माण व खटाव तालुक्‍यांमधील कोरोनाबाधित मृतांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. अंत्यविधीनंतर अस्थी, रक्षा विसर्जन शेजारी वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात सर्रास केले जाते. स्मशानभूमीत दररोज पाच ते दहा अंत्यविधी होत आहेत. हा कालवा श्री क्षेत्र पंढरपूरच्या पुढे वाहत जात आहे.

अनेक गावांनी आपले जलशुध्दीकरण प्रकल्प या कालव्याशेजारी उभे केलेले आहेत. फलटण तालुक्‍यातील जाधववाडी, कोळकी, फलटण, विडणीसह अनेक गावांचे जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच आहेत. रावरामोशी पुलाच्या पुढेच विडणीचा जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. सध्या प्रत्येक गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

विडणीमध्येही हा आकडा साठच्या पुढे गेला आहे. कालव्यामधील दूषित पाण्यामुळे विडणी ग्रामस्थांचेसुध्दा आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत विडणी ग्रामपंचायतीने तहसीलदार पाटील व फलटण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना निवेदन देवून याबाबत तोडगा काढून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळावे, अशी मागणी केली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT