satara
satara sakal
सातारा

Satara : उच्च शिक्षण, गोडाऊन, सोसायटी इमारतीसाठी बिनव्याजी कर्ज

सकाळ डिजिटल टीम

सातारा - शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात व देशात उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी एक कोटी ४८ लाख ७७ हजारांची तरतूद केली आहे. यामुळे शैक्षणिक कर्ज, तसेच गोडाऊन व सोसायटी इमारत बांधकामासाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज पडणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ६.६६ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, तर अमृत कुंभ योजनेतून मध्यम व दीर्घ मुदत कर्जाला साडेपाच ते आठ टक्के इतकी व्याज सवलती दिली आहे. बॅंकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात करपूर्व विक्रमी २०५ कोटी रुपयांचा नफा झाला असून, शेतकरी सभासदांना १२ टक्के लाभांश दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, जिल्हा बॅंकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असून, आरबीआयच्या नियमाला धरून आहे. बॅंकेला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही आणि चौकशीही झालेली नाही, असेही नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

या वेळी ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक- निंबाळकर, बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शिवरुपराजे खर्डेकर, दत्तानाना ढमाळ, प्रभाकर घार्गे, सत्यजित पाटणकर, ऋतुजा पाटील, सुनील खत्री, लहुराज जाधव, सुरेश सावंत, प्रदीप विधाते, ज्ञानदेव रांजणे आदी उपस्थित होते.

बॅंकेला झालेल्या नफ्यातून शेतकऱ्यांना विविध सवलती व तरतुदी करण्यात आल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, ‘‘बॅंकेच्या ठेवी ९८११ कोटी रुपयांचा असून, कर्ज वाटप ५४२९ कोटी ८० लाख इतके आहे. बॅंकेचा संमिश्र व्यवसाय १५ हजार ३२० कोटी ८० लाख इतका झाला आहे.’’

स्वनिधीत ६८ कोटी ८१ लाखांची भरीव तरतूद झाली असून, एकूण स्वनिधी ८४९ कोटी ६१ लाख इतका झाला आहे. अनुत्पादक कर्जे १२ कोटी ८३ लाखांची असून, याचे कर्जाशी प्रमाण ०.२४ टक्के आहे. ढोबळ एनपीएचे प्रमाणही कमी आहे. गत १६ वर्षे नेट एनपीए शून्य टक्के आहे.

नफ्यातून शेतकरी सभासदांसाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्यासाठी एक कोटी ४८ लाख ७७ हजार रुपयांची तरतूद केली असून, त्यामुळे शैक्षणिक कर्ज शून्य टक्क्याने पडणार आहे. अमृत कुंभ योजनेतून मध्यम व दीर्घ मुदत कर्जवसूल पात्र हप्त्यावर साडे पाच ते आठ टक्के व्याज सवलत दिली आहे.

त्यासाठी ५.५० कोटींची तरतूद केली आहे. कॅश क्रेडीट वसुली प्रोत्साहन परतावा योजनेसाठी एक कोटी ७५ लाखांची तरतूद केले आहे. विकास संस्थांच्या सचिवांना पगारवाढीसाठी एक कोटी ६० लाखांची तरतूद केली आहे. सभासदांना सर्वाधिक १२ टक्के लाभांश दिला जाणार आहे. ९६० पैकी ९४० सोसायटी नफ्यात आणण्यात बॅंकेला यश आले आहे, हा देशपातळीवरील विक्रम बॅंकेने केला आहे.

कर्मचाऱ्यांना २० टक्के सानुग्रह अनुदान १२.४२ कोटींची, तर दोन बक्षीस पगारासाठी १०.३३ कोटींची तरतूद केली आहे. बॅंकेस ७८ कोटी १६ लाख निव्वळ नफा झाला असून, राखीव निधीसाठी १९.५४ कोटींची तरतूद केली आहे, तर संशयित व बुडीत कर्ज निधीसाठी ६० कोटींची तरतूद केली आहे. शैक्षणिक, सोसायटी इमारत व गोडाऊन बांधकामासाठी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध केले आहे. ज्या सचिवांबाबत तक्रारी झाल्या आहेत, त्यांची चौकशी सुरू असून, अहवाल येताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नितीन पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT