Satara Latest Marathi News 
सातारा

3000 गृहभेटी घेऊन 'घरोघरी शाळा' उपक्रम ठरला राज्यात प्रेरणादायी; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तोंडभरुन कौतुक

सुरजकुमार निकाळजे

राणंद (जि. सातारा) : सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव (ता. माण) येथील उपक्रमशील शिक्षकांनी कोरोना काळात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या "घरोघरी शाळा' उपक्रमास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून विद्यार्थ्यांची प्रगती पाहिली व कौतुक केले. 

उपक्रमामध्ये सामाविष्ट विषय, विद्यार्थ्यांचे शब्द वाचन, गोष्टीची पुस्तके वाचन, इंग्रजी तक्ते वाचन व पाढे पाठांतर पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला व हा उपक्रम इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "शाळा बंद, शिक्षण सुरू' असताना शिक्षक संजय खरात यांनी वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून या विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरातच शाळा निर्माण केल्यामुळे इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहून त्यांच्या अध्ययन क्षमता विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. यासाठी श्री. खरात यांनी घेतलेले परिश्रम निश्‍चितच अभिनंदनीय व कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

3000 हून अधिक गृहभेटी घेऊन हा उपक्रम जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे मतही शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. घर हीच शाळा तयार झाल्याने विद्यार्थी शाळेपासून दूर राहिले नाहीत. शिक्षकांनी दिलेल्या विविध साहित्यांमुळे मुलांना हसत खेळत शिक्षण मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. घरात निर्माण झालेली शाळा आम्हाला आवडते. शिक्षकांनी पुरवलेल्या साहित्याचा वापर करून कधी पालकांच्या मदतीने तर कधी आम्ही स्वतःच अभ्यास करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शिखर शिंगणापूर शाळेच्या मुख्याध्यापिका अनुसया गोरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे स्वागत केले. दहिवडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आवळे यांनी सदर उपक्रमाविषयी अधिक माहिती देऊन आभार मानले.  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT