schools start Sakal
सातारा

सातारा : जादा शुल्क आकारल्‍यास कारवाई

शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचा शाळांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शाळा सुरू झाल्यानंतर खासगी शाळांनी महिनाभरात शाळा समितीने पालक संघाची बैठक घेऊन प्रवेश शुल्क निश्‍चिती करावी. शाळांनी शुल्क निश्‍चित केल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर माहितीपत्रक लावण्यात यावे. याबाबत येत्या महिन्यात कार्यवाही न झाल्यास व जादा शुल्क आकारल्याची तक्रार आल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी खासगी शाळांना दिला आहे.

दरवर्षी शहरातील खासगी माध्यमाच्या शाळा प्रवेश शुल्क निश्‍चित करूनही जादा शुल्क आकारण्याच्या निदर्शनास येते. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातील शाळांचा समावेश असतो. या प्रकारामुळे दरवर्षी पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा शाळा सुरू झाल्यानंतर तत्काळ शिक्षण विभागाने पत्र काढून तीस दिवसांच्या आत शाळा व्यवस्थापनाने पालक संघाची बैठक घेऊन शुल्क निश्‍चिती करण्याचे आदेश दिले आहेत.पान ६ वर

...तर दहापट दंड वसुली

खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांकरिता ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत देणे बंधनकारक आहे. या शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शुल्क अथवा देणगी आकारल्यास शुल्क रकमेच्या दहापट दंड संबंधित शाळेला आकारत कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. याबाबत शाळांनी नियमानुसार काम करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

शाळा सुरू झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने पालक संघांची एक महिन्याच्या आत बैठक घेऊन शुल्क निश्‍चिती करावी. शाळांनी नियमबाह्य शुल्क आकारल्यास कारवाई केली जाणार आहे.

-प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातचा आयकर विभागालाही गंडा?

Satara News: साताऱ्यात मृतदेहांची अदलाबदल;एकाच स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार,हलगर्जीप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित!

SCROLL FOR NEXT