सातारा

कऱ्हाड तालुक्यातील तुळसणमध्ये 17 जणांना केले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा

उंडाळे (ता. कऱ्हाड) : तुळसण येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावातील बाधितांची संख्या सातवर गेली. वाढत्या संसर्गामुळे ग्रामस्थ भयभीत आहेत. बाधीताच्या सहवासातील 17 जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले. दरम्यान केसे येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने कराड तालुक्यात नव्याने सात रुग्णांची भर पडली आहे.

तीन दिवसांपूर्वी तुळसण येथे मुंबईहून 18 मार्चला आलेल्या एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोना बाधीत आढळला. त्यात त्यांच्या निकत सहवासासह कुटुंबातील 17 जणांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आले. बाधिताच्या संपर्कात आलेल्या निकट सहवासीत व्यक्तींपैकी पहिल्या दिवशी 15 जणांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतर शुक्रवारी संबंधित बाधिताच्या घरासमोरील दोघांना शुक्रवारी त्रास जाणवू लागल्यानंतर कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एकाचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी सकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांच्या निकट संपर्कातील पाच जण बाधीत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तुळसणमध्ये बाधितांची संख्या सात झाली आहे.

आता बाधितांच्या संपर्कातील आणखी सतरा जणांना क्वारंटाईन  केले आहे. तुळसण व परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व ग्रामसमितीने ग्रामपंचातीच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या आहेत. गाव पूर्णतः  सील केले आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला असून येथील दूरक्षेत्राच्या उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, हवालदार चव्हाण, हवालदार काळे आदींनी बंदोबस्त ठेवला आहे. येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.  एस. बी. पाटील, सरपंच उषादेवी पाटील, ग्रामसेवक आशिष कांबळे, अॅड. ए. वाय. पाटील आदींसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील यांनी बैठक घेऊन प्रशासनाच्या वतीने सूचना केल्या.

दूरावलेले लेकरू पाच दिवसांनी आईच्या कुशीत

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT