karad 
सातारा

मसूर परिसरात 16 गावांत "एक गणपती'

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) ः मसूर पोलिस दूरक्षेत्रातील 32 पैकी 16 गावांनी प्रतिसाद देत "एक गाव, एक गणपती' बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले होते. उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड व मसूर पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावात सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत सोशल डिस्टन्स पाळत बैठका सुरू आहेत. 

पोलिसांनी केलेल्या आवाहनास गावोगावच्या सार्वजनिक मंडळांनी "एक गाव, एक गणपती' या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. दूरक्षेत्राच्या हद्दीतील पाचुंद, खराडे, अंतवडी, रिसवड, शहापूर, पिंपरी, कोणेगाव, वाण्याचीवाडी, वाघेश्वर, यादववाडी, चिंचणी, जुने कवठे, नवीन कवठे, केंजळ, खोडजाईवाडी, कचरेवाडी, बेलवाडी या गावांनी "एक गाव, एक गणपती' बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कार्यक्षेत्रातील उर्वरित गावातही पोलिसांनी बैठका घेण्याचे आयोजन केले आहे. दोन ते अडीच फुटांपर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. यावर्षी गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे आगमन अथवा विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, देखावे करता येणार नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळत चार ते पाच कार्यकर्त्यांनीच गणेशमूर्तीसमोर आरती करावी, मसूर, हेळगाव, किवळ, शामगाव निगडी या मोठ्या गावांत "एक गाव, एक गणपती' या उपक्रमासाठी ग्रामस्थांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी केले आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT