Satara Latest Marathi News Satara News Satara Entertainment News 
सातारा

जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ..; कलाकारांची रसिक मायबापांना आर्त हाक

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : सर्कसमध्ये प्राण्यांवर बंदी आणल्यापासून निम्मे रसिक कमी झाले. मात्र, त्यानंतर जिमनॅस्टीक खेळ, मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे सर्कसला पसंती मिळत आहे. परंतु लॉकडाउनमध्ये सर्कसवाल्यांची तारेवरची कसरत झाली. दररोजचा डोंगराएवढा खर्च, कर्ज, त्याचे व्याज फेडता फेडता नाकीनऊ आले, अशी खंत सर्कस मालक प्रकाश माने यांनी व्यक्त केली. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आता पुन्हा नव्या उमेदीने सर्कसचे खेळ सुरु करत आहोत. सर्कसचे भवितव्य आता मायबाप रसिकांच्याच हातात आहे, अशी आर्त सादही मानेंनी रसिकांना आज घातली.

सर्कसचा कार्यक्रम कऱ्हाडला उद्या रविवारपासून सुरु होत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. माने बोलत होते. यावेळी व्यवस्थापक ज्वाला सिंग उपस्थित होते. सर्कस ही काही दिवसांचीच सोबती राहिली आहे, असे सांगून श्री. माने म्हणाले, तीन पिढ्यांपासून आम्ही सर्कस चालवत आहोत. भारत देशातील मराठ्याची असलेली एकमेव सुपरस्टार ही सर्कस आहे. सर्कस हे आमचे एक कुटुंब असून त्याच्यावर सुमारे १०० जणांची कुटुंबे चालतात. ही सर्कस मी देशातील १० राज्यात नेली, तिथे चांगला प्रतिसाद आणि प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र, मराठ्याची सर्कस असूनही मला महाराष्ट्रात लॉकडाउन काळात नाहक त्रास झाला. त्यामुळे खूपच वाईट वाटले. 

लॉकडाउन काळात कार्यक्रम बंद राहिले, त्यामुळे दररोजचा ५० ते ६० हजारांचा डोंगरा एवढा खर्च, सर्कशीसाठी काढलेले कर्ज, त्याचे व्याज हे डोक्यावर घेवून आम्ही जगत आहोत. हे कर्ज फेडता-फेडता नाकीनऊ आले आहे. मात्र, मी जर थांबलो तर शंभर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे त्यांची कुटुंबे चालावी आणि सर्कसची परंपरा पुढेही सुरु रहावी यासाठी पुन्हा नव्या उमेदीने सर्कसचे खेळ सुरु करत आहोत. त्याला पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशाही त्यांनी शेवटी व्यक्त केली. मायबाप रसिकांनी साथ दिली तरच सर्कसचे भवितव्य टिकणार आहे. त्यामुळे मायबात रसिकांच्याच हाती सर्कचे भवितव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कऱ्हाडला उद्या (रविवार) पासून महिनाभर सर्कसचे कार्यक्रम होणार आहेत.  

महाराष्ट्रातील माणसाची 'सुपरस्टार' ही देशातील एकमेव सर्कस आहे. त्याला प्रतिसाद देणे हे महाराष्ट्रवासियांचे कर्तव्य आहे. सर्कसमधील कला डोळ्याने पाहिल्याशिवाय कळत नाही. सर्कसच्या जगातील सर्वात लहान जोकर आमच्याकडे आहे, ही या सर्कशीची खासियत आहे.  
-प्रकाश माने, मालक, सुपरस्टार सर्कस

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT