Satara 
सातारा

पंढरीच्या वाटेवर पाच पावली मिरवणूक; कोरोनातही "ज्ञानोबा'च्या घोषाने दुमदुमली गोंदवलेनगरी

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले (जि. सातारा) : आषाढी एकादशी निमित्ताने आज येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीमध्ये मोजक्‍या वारकऱ्यांचा सहभाग असूनही "ज्ञानोबा'च्या जयघोषाने अवघी गोंदवलेनगरी दुमदुमली. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायी वारीला पहिल्यांदाच यंदा विठू नगरीत जाता आले नाही. मागील शुक्रवारी (ता. 26) प्रातिनिधिक स्वरूपामध्ये "श्रीं'च्या पायी दिंडीची मिरवणूक गावातून काढून पंढरीच्या वाटेवर पाच पावली करून "श्रीं'च्या पादुका समाधी मंदिरातील 
एका कक्षात विराजमान करण्यात आल्या होत्या. वारी दरम्यान होणारी पूजाअर्चा दररोज येथेच करण्यात येत होती. 

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी आठच्या सुमारास समाधी मंदिर समितीचे विश्वस्त व वारकऱ्यांच्या हस्ते या पादुकांची पूजाअर्चा करून ग्रामप्रदक्षिणेसाठी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी पताकाधारी आणि टाळकरी अभंगात न्हाऊन निघालेले होते. गावातील विविध मंदिरांमध्ये पादुकांची पूजा करण्यात आली. आजही पंढरीच्या वाटेवर पाच पावले चालून वारकऱ्यांनी वारीचे समाधान मानून घेतले. समाधी मंदिरात या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. 

विठ्ठल मंदिरात भजन- गायन 

दरम्यान, वारकरी मंडळाच्या वतीने येथील विठ्ठल मंदिरात भजन- गायन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना प्रसाद देण्यात आला; परंतु या सर्वच सोहळ्यावर कोरोना विषाणू संसर्गाचे सावट दिसून आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT