Satara 
सातारा

तलावातील गाळाऐवजी गौण खनिजाचे उत्खनन! घारेवाडीतील ग्रामस्थांची तक्रार

विलास खबाले

विंग (जि. सातारा) : घारेवाडी (ता. कऱ्हाड) जवळच्या पाझर तलावात गौण खनिज उत्खननाचे गौडबंगाल काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पोकलेनने खुदाई अणि डंपरद्वारे सुरू असलेली वाहतूक चुकीची आणि बेकायदेशीर असल्याची जोरदार चर्चा आहे. 

घारेवाडीजवळ धुळोबाच्या पायथ्याशी 1927 मधील दुष्काळातील पाझर तलाव आहे. पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने स्वखर्चातून गाळ काढून खोलीकरणाची मागणी एका ठेकेदाराने केली होती. लघुपाटबंधारे जलसंधारण उपविभागाने त्यास मंजुरी दिली आहे. मंजूर पत्राद्वारे त्याठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे. एक पोकलेन व चार डंपर त्याठिकाणी आणले आहेत. संबंधितांनी तलावाच्या पूर्वेस शिवम बाजूला प्रारंभी काम हाती घेतले आहे. मात्र, गाळाऐवजी त्यांनी गौण खनिजाला हात घातल्याचे निदर्शनास येताच त्याला विरोध झाला. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी त्यास जोरदार विरोध दर्शवला. त्यानंतर संबंधितांनी तेथून साहित्य हलवले. मात्र, धुळोबा पायथ्याला पुन्हा उत्खनन सुरू केले आहे.

मागील आठ दिवसांपासून हे उत्खनन सुरू आहे. एक पोकलेन व चार डंपरने दररोज वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यातून गाळाऐवजी मुरमाची वाहतूक सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असून, काम चुकीचे अणि बेकायदेशीर सुरू असल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. मात्र, संबंधितांनी विरोध झुगारून काम सुरूच ठेवले आहे. अनेकांनी कामाचे फोटो अणि व्हिडीओही घेतले आहेत. अर्जदाराच्या मंजूर पत्रातील माहितीवरून संबंधित विभागाने तलावातील फक्त गाळ काढण्यास परवानगी दिली आहे. मुख्य भिंतीपासून 100 मीटर आत गाळ काढण्याबाबत त्यात उल्लेख आहे. अर्जदाराने संबंधित उपविभाग सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्यांशी संपर्क साधून गाळ काढण्याचा उल्लेखही त्यात आहे. मात्र, गाळऐवजी गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्याठिकाणी निदर्शनास येत आहे. वनसंपदेचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात आहेत. त्याबाबतीत उलटसुलट चर्चा होत आहे. वाहतूक केलेला मुख्य रस्त्यावर खड्डे पडून नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 

ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीकडे अर्ज 

दरम्यान, घारेवाडीतील काही ग्रामस्थांनी पाझर तलावातील खुदाई व वाहतुकीबाबतची माहिती, तसेच जागेची नक्कल आदी माहितीची मागणी लेखी अर्जाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली असून, त्यानंतर मात्र, हे काम बंद ठेवल्याचे सांगण्यात आले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT