Satara 
सातारा

कोरेगावातील अतिक्रमणे हटवून हद्दवाढ करा, शहर विकास मंचची मागणी

पांडुरंग बर्गे

कोरेगाव (जि. सातारा) : शहरातील अतिक्रमणे ताताडीने हटवून हद्दवाढ करावी व शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी कोरेगाव शहर विकास मंचने एका निवेदनाद्वारे कोरेगावच्या प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. 

शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष किशोर बर्गे, दिलीपराव बर्गे व राजू बागवान यांनी हे निवेदन सादर केले असून, त्यावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे, की कोरेगाव शहर एक तालुक्‍याचे गाव असून, या शहराची लोकसंख्या आजमितीस 40 हजारांवर गेलेली आहे.

जुन्या गावठाणात गर्दी झाल्याने शहरातील व शहरात राहण्यास आलेली कुटुंबे शहरापासून दूरपर्यंत जागा मिळेल, अशी लोकवस्ती करून राहात आहेत. लोकवस्ती वाढल्यामुळे त्यांच्या रस्ता, वीज, पाणी, गटार आदी गरजाही वाढत चाललेल्या आहेत, तसेच कोरेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. या सर्व नागरिकांच्या अपेक्षांचा बोझा नगरपंचायतीवर येत आहे. त्यामुळे कोरेगाव शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे कर रूपाने येणारे उत्पन्न वाढेल व सर्व नगारिकांनाही सर्व सुविधा पुरविणे शक्‍य होईल. 

नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड अतिक्रमणे वाढलेली आहेत. सातारा- पंढरपूर रस्ता कोरेगाव शहरातून जात असल्यामुळे प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अतिक्रमणे वाढली असल्याने रस्ता वाहतुकीस कमी पडतो आहे. परिणामी अनेक वेळा वाहनांची कोंडी होऊन रस्ता वाहतुकीस रिकामा होण्यास वेळ लागतो. तेव्हा प्रशासनाने नगरपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावी, तसेच रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊनही रस्त्यांचे काम थांबलेले आहे. हे काम तातडीने सुरू करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT