jawali 
सातारा

खरीप तोंडावर... कुठुन आणायची खते, बियाणे

सकाळ वृत्तसेवा

केळघर (जि. सातारा) : केळघरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने संपूर्ण गाव सील करून प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद आहेत. खरीप हंगामात त्याचा मोठा फटका विभागातील शेतकऱ्यांना बसला आहे. 

खरीप हंगाम तोंडावर असताना खते, बी-बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असून बी-बियाणे वेळेत उपलब्ध न झाल्यास हंगामाचे गणितच बिघडून जाणार आहे. केळघरमध्ये सहा बाधित रुग्ण सापडल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ गेले आठवडाभर बंद आहे. त्यातच केळघर हे विभागातील 20 ते 25 गावांसाठी बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ही गावे पूर्णपणे केळघर बाजारपेठेवर अवलंबून आहेत. त्यामुळे केळघरची बाजारपेठ बंद असल्याचा फटका विभागातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. सध्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण असल्याने या आठवड्यात भात पिकाचे तरवे पेरणीस प्रारंभ होणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथील बाजारपेठ आठ जूनपर्यंत बंद राहणार आहे. 

बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांना मेढा, सातारा येथे बी-बियाणे, खते खरेदीसाठी जावे लागत आहे. त्यात पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने शेतीची कामे थांबल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 


केळघरमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने बाजारपेठ बंद आहे. मात्र, शेतीची कामे थांबू नयेत, अशी प्रशासनाची भूमिका आहे. केळघरमधील कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाची नोंदणी करून हा माल शेतकऱ्यांना घरपोच करावा. प्रतिबंधित क्षेत्र उठल्यावर आवश्‍यक ती दुकाने सुरू होतील. 

- शरद पाटील, तहसीलदार, जावळी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT