सातारा

डिजिटल इंडिया मिशनचा पर्दाफाश; बेरोजगार युवकांची फसवणुक टळणार

प्रवीण जाधव

सातारा : डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत विविध पदांसाठी निवड झाल्याची पत्रे पाठवून 28 हजार 200 रुपये पगाराची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवणारी पत्रे बेरोजगार युवकांना पाठविलेल्या प्रकरणाची पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या निर्देशानुसार झालेल्या प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित पत्रे ही फसवणूक असल्याचे समोर आले आहे. परप्रांतातील संबंधित व्यक्तीचा शोध लावण्यापर्यंत पोलिस यंत्रणा पोचली आहे.
 
सध्याच्या परिस्थितीत बेरोजगार युवकांच्या अस्वस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही टोळ्यांकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता जिल्ह्यातील अनेक युवकांना कम्युनिकेशन आणि टेक्‍नॉलॉजी मंत्रालयाच्या लेटरपॅडवर डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत नियुक्तीची पत्रे पाठविली आहेत. या पत्रांबरोबर वर्तणूक चांगली असल्याचे, कोणताही गुन्हा दाखल न झाल्याचे उमेदवारांचे स्वयंघोषणा पत्राचाही नमुना आहे. त्याचबरोबर नोकरीच्या नियम व अटी, तसेच प्रशिक्षणाबाबतची माहिती देणारी, तसेच डिजिटल इंडिया मिशनचा उद्देश सांगणारी पत्रेही आहेत.
 
या पत्रानुसार डिजिटल इंडिया मिशनमध्ये शिपाई, स्वच्छता कर्मचारी, डाटा ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, प्रोसेस सर्व्हर, क्‍लार्क, ड्रायव्हर, कॉल ऑपरेटर अशा विविध पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे, तसेच 28 हजार 200 रुपये पगार मिळणार आहे. यामध्ये एक अट ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रशिक्षण कालावधीतून कोणी निम्म्यातून सोडून जाऊ नये, कोणी खोटी कागदपत्रे दिली असतील किंवा प्रशिक्षणाची माहिती बाहेरच्यांना दिल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणाआधी प्रत्येकाला 11 हजार 500 रुपये द्यावे लागणार आहेत. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना हे पैसे परत दिले जातील, तसेच नियम मोडणाऱ्यांची रक्कम जप्त करण्यात येईल, असे पत्रामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे पैसे लाटण्याच्या आमिषाने हा सर्व उद्योग सुरू असल्याचे स्पष्ट होत होते.
 
याबाबत "सकाळ'ने 18 जुलैच्या अंकामध्ये वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील युवकांना सावध राहण्याचे आवाहन केले होते. या वृत्ताची पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गंभीरपणे दखल घेतली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने असलेली कामे व क्राईम मिटिंगची गडबड असूनही त्यांनी संबंधित प्रकरणाची माहिती मागावून घेतली. रात्री असे पत्र आलेल्यांकडून सविस्तर माहितीही घेत फसवणुकीचा प्रकार जाणून घेतला. यामध्ये अनेक युवक फसण्याची शक्‍यता असल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांना दिले. त्यानंतर तातडीने संबंधितांना समीर शेख यांची भेट घेण्यास सांगितली. या प्रकरणात आलेली पत्रे पाहिल्यानंतर शेख यांनीही तातडीने चौकशी सुरू केली. 

संबंधित उत्तर प्रदेशातील 

सायबर सेलच्या माध्यमातून सहायक पोलिस अधीक्षक शेख यांनी संबंधित व्यक्तीची माहिती मिळविण्यात यश मिळविले आहे. संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती विचारात घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.

...म्हणून मी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : आमदार शशिकांत शिंदे 

पाेलिसांच्या खिसे भरु प्रवृत्तीमुळे सातारकरांचा जीव टांगणीला

...म्हणून आमदार महेश शिंदेंची काेरेगावला खास भेट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

MNS- MVA Morcha: मग लोकसभेत ३१ खासदारांनी मतचोरी केली होती का? मविआ-ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचा सवाल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांवर 'डिजिटल' नजर! नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने विकसित केली ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २,५४० कोटींची मदत; रब्बी हंगामासाठी १,७६५ कोटींचे पॅकेज जाहीर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT