patan 
सातारा

शेतकऱ्यांची हाक... कुणी भाजी घेता का भाजी!

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे बंद असलेले आठवडा बाजार, स्थानिक यंत्रणा व पोलिसांकडून दुकाने लावण्यास होणारा विरोध, विक्री व काढणीविना भाजीपाला शेतातच पडून राहिला आहे. भाजीपाला आणि मोठ्या बाजारपेठांत शेतमाल पाठविण्यात अडचणी येत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावर जीव धोक्‍यात घालून भाजीपाला विक्रीची वेळ अनेक शेतकरी कुटुंबीयांवर आल्याचे चित्र ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर ठिकठिकाणी दृष्टीस पडत आहे. 

ढेबेवाडी खोऱ्याला लपेटून दक्षिण-उत्तर वाहणारी वांग नदी महिंद, मराठवाडी, साखरी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने आता बारमाही वाहायला लागली आहे. पाणीपुरवठ्याची शाश्‍वती आल्याने विभागात ओघानेच बागायती क्षेत्रही वाढले असून उसाबरोबरच भाजीपाला आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकरी घेत आहेत. आतापर्यंत शेतकरी स्थानिक आठवडा बाजार, नियमित भरणाऱ्या मंडईबरोबरच कऱ्हाड व मुंबईला भाजीपाला विक्रीस पाठवायचे. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून त्यांचे भाजीपाला विक्रीचे गणितच विस्कटले आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला यंत्रणेचा डोळा चुकवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही जण दुचाकीवरून गावोगावी फिरून भाजीपाला विक्री करत असले तरी सर्वच शेतकऱ्यांना हे शक्‍य होत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना नेहमीच्या जागेवर बसून भाजीविक्री करण्यास विरोध होत असल्याने ते वर्दळीच्या रस्त्यावर बसून भाजीपाला विकत असल्याचे चित्र कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी दृष्टीस पडत आहे. या मार्गाचे चौपदरीकरण झाल्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. अनेक शेतकरी साइडपट्ट्यावर बैठक मारून भाजीविक्रीस बसत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. 

...तर सुरक्षिततेसह दिलासाही मिळेल 
रस्त्याकडेला विक्रीस मांडलेल्या विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या खरेदीसाठी वाहनचालक अचानक ब्रेक लावून रस्त्यावर वाहने थांबवत असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. खरेदीसाठी रस्त्यावर होणारी गर्दीही अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी दक्षता पाळत संबंधित गावांजवळ योग्य ठिकाणी भाजीपाला विक्रीची व्यवस्था केल्यास त्या-त्या गावातील शेतकऱ्यांना सुरक्षिततेबरोबरच दिलासाही मिळू शकेल. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT