jawali 
सातारा

या गावात दुभत्या जनावरांसह शेतकरी पोचले पोस्टात

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः भारतीय जनता पक्षाच्या सातारा तालुका शाखेतर्फे क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथे शेतकऱ्यांनी दुभत्या जनावरांसह पोस्ट कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवण्यात आली. दुधाला दर व दूध पावडर भुकटीला अनुदान मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन झाले. 

गायीच्या दुधाला प्रतिलिटर 10 व गायीच्या दुधाला 30 रुपये अनुदान मिळावे, दूध पावडर भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी भाजपने आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी सर्वांना दूध पुरवठा केला. त्यांनाच सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. या दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी भाजपने दूध एल्गार आंदोलन सुरू केले आहे. एक ऑगस्टला महाराष्ट्रात शासनाचा निषेध करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले, तरीही शासनास जाग आली नाही म्हणून महाराष्ट्रातून पाच लाख पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून शासनाला जागे करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आज क्षेत्र माहुली येथील पोस्ट ऑफिसमध्ये दुभत्या जनावरांसह शेतकऱ्यांनी जाऊन विनंती पत्रे मुख्यमंत्र्यांना पेटीत टाकली. 

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहराध्यक्ष व नगरसेवक विकास गोसावी, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, प्रवीण शहाणे, गणेश पालखे, जिल्हा कायदा आघाडीचे अध्यक्ष प्रशांत खामकर, सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सुधीर काकडे, स्वप्नील बोराटे, माजी सरपंच अरुण माने, अमर जाधव व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 


शासनाला जाग येईपर्यंत व दुधाला अनुदान मिळेपर्यंत हे आंदोलन यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. 

- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT