टाळ, मृदंगात स्वाभिमानीचे सत्याग्रह आंदोलन  sakal
सातारा

सातारा : टाळ, मृदंगात स्वाभिमानीचे सत्याग्रह आंदोलन

कार्यकर्त्यांनी केलेल्या भजनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात टाळ मृदंगाचा आवाज घुमला.

उमेश बांबरे

सातारा : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एफआरपीचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, वीज वितरणची बोगस बिलांतून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुरांडे या वर्षी पेटू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या भजनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात टाळ मृदंगाचा आवाज घुमला.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी टाळ, मृदंगाच्या साथीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या भजनामुळे परिसरात दणाणून गेला. श्री. शेळके म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटातून हातचा रोजगार गेला, उद्योग व्यवसायांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शेतीची नासधूस होऊन शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने भक्कम पाठिंबा देण्याऐवजी सरकार सर्व शेतकरी व सामान्यांना उद्‌ध्वस्त करणारे निर्णय घेण्याचे कट कारस्थान करत आहे. या बाबींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व संपूर्ण संघटना अनेक दिवसांपासून भांडत आहे. आंदोलने, मोर्चे काढून न्याय मागत आहेत, तरीही शासन दखल घेत नाही. उलट केंद्रात व राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असल्याने एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे वारंवार दिसून येत आहे.’’

या वेळी अर्जुनभाऊ साळुंखे, अनिल पवार, धनंजय महामुलकर, देवानंद पाटील, श्रीकांत लावंड, तानाजी देशमुख, दादासाहेब यादव आदींसह शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अतीत ग्रामपंचायतीने पाठिंबा दर्शविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT