बटाटा उत्पादकांत नाराजी sakal
सातारा

सातारा : बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ

खटाव तालुक्‍यातील बाजारपेठांत शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

सकाळ वृत्तसेवा

विसापूर : घटलेले उत्पन्न, अत्यल्प बाजारभाव, खते आणि बियाण्यांचे वाढलेले दर, भांडवलाची कमतरता, पावसाने फिरवलेली पाठ, निसर्गाचा लहरीपणा अशा विविध कारणांमुळे यंदाच्या खरीप हंगामात खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील खेड-मंचर नंतर बटाटा बियाण्याची विक्रमी विक्री आणि उत्पादन घेणाऱ्या या तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या बटाटा बाजारपेठांत बियाणे खरेदीसाठी शुकशुकाट दिसत आहे. कोट्यवधींची उलाढालही ठप्प आहे.

तालुक्‍यातील पुसेगाव, वडूज, पुसेसावळी, औंध, म्हासुर्णे आदी ठिकाणच्या बाजारपेठांतून बटाटा बियाण्यांना मोठी मागणी असते. तीन-चार वर्षांपूर्वी या बाजारपेठांत विक्रीसाठी चारशे ते पाचशे ट्रक बियाणे पंजाब येथून दाखल होत असे. गेल्या वर्षी सुमारे शंभर ट्रक बियाणे विक्री झाले होते. मात्र, यंदा बटाटा बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने सरासरी फक्त वीस ट्रक बियाण्यांची विक्री झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे बटाट्याच्या बाजारपेठांत, तसेच बटाटा बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांत शुकशुकाट आहे.

खटाव तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असला तरी, या तालुक्‍याचा बराचसा भाग उंच पठारावर आहे. येथील थंड हवामान बटाटा पिकास पोषक असल्याने दरवर्षी परिसरातील गावे आणि वाड्यावस्त्यांवरील शेतकऱ्यांचा खरीप हंगामामध्ये नगदी पैसे मिळवून देणाऱ्या बटाटा पीक लागवडीकडे कल असतो. तालुक्यात अगदी दोन क्विंटलपासून दोनशे क्विंटल बटाट्याची लागवड शेतकरी करत होते. मात्र, गेली चार-पाच वर्षांपासून उत्पादित बटाट्याला योग्य बाजारभाव मिळत नाही.

त्यातच निसर्गाच्या लहरीपणा, अवेळी पाऊस यामुळे जमिनीत किंवा ऐरणीत बटाटा सडण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. तसेच वारंवार बटाटा पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी झाला आहे. त्यामुळे आठ ते दहा क्विंटलचा पडणारा उतारा घसरून आता चार-पाच क्विंटलवर आला आहे. त्यातच मजुरी, खते, औषधे, मशागत यांचे दर वाढल्याने पूर्वीसारखा नफा मिळत नाही. त्यामुळे बटाटा पिकाला बगल देत सोयाबीन पेरणीकडे कल वाढविला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT