Satara 
सातारा

भैरवगडात भूस्सखलनाची भीती, प्रशासनाकडून निवारा केंद्रांची सोय

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि. सातारा)  : सुरू झालेल्या पावसाळ्यात भूस्सखलनाची टांगती तलवार असलेल्या भैरवगड (टोळेवाडी, ता. सातारा) येथील तब्बल 118 कुटुंबांसाठी प्रशासनाने तात्पुरत्या निवारा केंद्राची सोय केली आहे. ही निवारा केंद्रे नुकतीच त्यांच्या ताब्यात देण्यात आली. ग्रामस्थांनी तेथे लवकरात लवकर वास्तव्यास येणे गरजेचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मांडवे (ता. सातारा) येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भैरवगड येथील विस्थापित कुटुंबाना नुकतेच तात्पुरत्या निवाऱ्यासाठी बांधण्यात आलेल्या घरांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी येत्या काळात प्रशासन या गावाचे पुनर्वसन करण्यास कटिबद्ध आहे, अशी माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली. जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते, पंचायत समिती सदस्या विजया गुरव, तहसीलदार आशा होळकर, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. टी. अहिरे, विद्युत विभागाचे उपअभियंता श्री. बिरासदार आदी उपस्थित होते. 

"आता पावसाळा जवळ आला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विस्थापित कुटुंबाना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. ग्रामस्थांनीही लवकर या घरांमध्ये राहावयास येणे आवश्‍यक आहे. मांडवे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उदात्त हेतूने या विस्थापित कुटुंबांना आपल्या गावात जागा देऊन सामावून घेतले आहे. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये अजून बऱ्याच बाबी अपूर्ण असून, त्या लवकरच पूर्ण करण्यात येतील. या विस्थापितांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनही कटिबद्ध आहे,' असेही श्री. मुल्ला यांनी नमूद केले. 

आशा होळकर यांनी ग्रामस्थांना वाटप करण्यात येणाऱ्या घरांची यादी वाचून दाखवली. प्रशासनातर्फे 118 विस्थापित कुटुंबांना या वेळी ही घरे देण्यात आली. बाजार समितीचे माजी सभापती ऍड. लालासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मांडव्याचे सरपंच राजेंद्र माने, भैरवगडचे सरपंच रामचंद्र साळुंखे, मंडलाधिकारी नारायण जावलीकर, मंडलातील सर्व तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. तुकाराम साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास भैरवगडसह मांडवे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT