Satara
Satara 
सातारा

कासजवळ पुन्हा रस्ता खचण्याची भीती, अपघाताची शक्‍यता

सुर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : पारंबे फाट्यापासून कासकडे जाताना 700 मीटर अंतरावर डांबरीकरणाचा मुख्य रस्ता गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर एका बाजूने खचला होता. बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने तत्काळ उपाययोजना करून दगडाचा भरावा करण्याचे काम झाले होते. मात्र, आता गतवर्षी दगडाचा भरावा टाकलेला हा रस्ता सध्या पुन्हा आणखी खचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

गतवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पारंबे फाट्यापासून कासकडे जाताना काही अंतरावरच 60 मीटर लांब साइडपट्टी खचून 20 ते 30 मीटर लांब व सात ते आठ मीटर रुंद रस्ता खचलेला होता. त्यानंतर त्याच परिस्थितीमध्ये दुचाकीसह सर्व छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वर्षभर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली गेली नसल्याने खचलेल्या या रस्त्याच्या एका बाजूला काही ठिकाणी तीव्र उतार व दुसऱ्या बाजूला दाट झाडी आहे. आता सध्या उताराने पावसाचे पाणी या ठिकाणी येत असल्याने गतवर्षी दगडाचा भरावा टाकलेला हा रस्ता सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीने आणखी खचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी बांधकाम विभागाकडून या ठिकाणी मोरी बांधून व डांबरीकरण करून तत्काळ उपाययोजना करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थ, वाहनचालकांतून होत आहे. 

गतवर्षी कासच्या फुलांच्या हंगामात या ठिकाणी पर्यटकांना वाहतूक करताना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी कास पठार कार्यकारी समितीने दोन्ही बाजूला सुरक्षा रक्षक नेमले होते. यावर्षी कासचा हंगाम कोरोनामुळे शक्‍य नसल्याने येथे समितीचे सुरक्षा रक्षक नसणार असल्यामुळे याठिकाणी सुरक्षितेबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. 


""गेल्या वर्षी सात ऑगस्टला हा रस्ता खचला त्यावेळी भराव टाकून तात्पुरता रस्ता सुरू करून दिला. आजअखेर एक वर्ष झाले तरी तो रस्ता तसाच आहे. आता या ठिकाणी भरपूर पाणी साठले असून, गेल्या चार-पाच दिवसांत या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, या भरावाच्या ठिकाणी पाणी साचत असल्याने रस्त्याला धोका निर्माण होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण?'' 

-सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, 
कास पठार कार्यकारी समिती 

संपादन : पांडुरंग बर्गे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT