सातारा

आरोग्य विभागात येथे आहे नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना तपासणीमध्ये जिल्ह्याला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आरटी-पीसीआर लॅब तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मशिनच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, या लॅबचे कामकाज करण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळासाठी आरोग्य विभागाकडून जाहिरातही काढण्यात आली आहे. ही मशिन जिल्हा रुग्णालयात बसविल्यावर जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे नमुने पुण्याला पाठविण्याची आवश्‍यकता भासणार नाही. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत -जास्त नागरिकांची तपासणी होणे आवश्‍यक असल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे. त्यासाठी राज्यामध्येही कोरोना संसर्ग तपासणीच्या प्रयोगशाळा वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांच्याही तपासण्या कराव्या लागत आहेत. नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागत असल्याने अहवाल येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात आहे. तोपर्यंत रुग्णांवर वेगाने उपचार सुरू करता येत नाहीत. त्यामळे रुग्णांचे तातडीने निदान आणि उपचार होण्यासाठी जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाला कोरोनाची चाचणीची परवानगी देण्यात आली. 

त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही या तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्यानुसार ट्रूनॅट हे अद्ययावत मशिन बसविले आहे. परंतु, हे मशिन केवळ रुग्णांच्या स्क्रिनिंगसाठी उपयोगात येत आहे. या मशिनवर केलेल्या तपासणीत एखादा रुग्ण निगेटिव्ह आढळला आणि त्याचा स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविल्यास त्या अहवालात काही बदल झाला, असे होत नाही. परंतु, पॉझिटिव्ह अहवालाबाबत या मशिनच्या तपासणीवर 100 टक्के विसंबून राहता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे ते नमुने पुन्हा पुण्याला पाठवावे लागत होते. परिणामी जादा वेळ जात होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आरटी-पीसीआर मशिनची आवश्‍यकता असल्याबाबत "सकाळ'नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. 

पुण्यामध्ये आरटी-पीसीआर मशिनच्या साह्याने कोरोना संशयिताची तपासणी केली जाते. या मशिनची निदानाची अचूकता जास्त आहे. जिल्ह्यामध्ये ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यामार्फत शासनाकडे आरटी-पीसीआर मशिन उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच ही मशिन शासनाकडून उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्याच्या साह्याने दररोज 200 ते 230 नमुण्यांची तपासणी केली जाऊ शकते. सध्याचे नुमने घेण्याचे प्रमाण पाहता ही मशिन उपलब्ध झाल्यावर जिल्ह्यातून पुण्याला नमुने तपासणीसाठी पाठवावे लागणार नाहीत. त्यामुळे अहवाल लवकर प्राप्त होऊन रुग्णांवर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात. 

मशिनसाठी जिल्हा रुग्णालयात आरटी-पीसीआर लॅबही तयार करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या मनुष्यबळाची जाहिरातही देण्यात आली आहे. त्यामध्ये मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजिस्ट, एम.एससी. मायक्रोबायोलॉजीस्ट, लॅब टेक्‍निशिअन, लॅब असिस्टंट व वॉर्ड बाय ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे. प्रतिदिन ४०० रुपये ते ७५ हजार रुपयांपर्यंत प्रतिमहा पगार या पदांसाठी ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Pune Crime : पुण्यात खळबळ! मैत्रीचा झाला रक्तरंजित शेवट; सिमेंटच्या दगडाने मित्राला संपवलं

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

Electric Vehicles Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दणक्याला 'इलेक्ट्रिक' उत्तर! ई-वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ; राज्यात नऊ लाख, तर जळगावात 23 हजार 'ईव्ही'

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

SCROLL FOR NEXT