karad 
सातारा

सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू; 541 गावे कोरोनाबाधित

उमेश बांबरे

सातारा : आतापर्यंत निकट सहवासीत, प्रवासातून कोरोनाची बाधा होत होती. त्यातच हाय रिस्क असलेल्या व्यक्तींनाही सर्वाधिक धोका होता. पण, आता गावेच्या गावे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागली आहेत. आतापर्यंत 541 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून, सर्वाधिक रुग्ण शिरवळ 130, पुनवडी 129 तर जिहे येथे 89 रुग्ण सापडले असून, ही गावे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहेत. यासोबतच कोणताही संपर्क नसलेल्या व्यक्तीही कोरोनाबाधित आढळू लागल्या आहेत. त्यांचे प्रमाण सध्या जरी अल्प असले तरी त्यातून धोका वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यात समूह संसर्गाची सुरवात झाली असे म्हणता येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडकर यांनी नमूद केले आहे. 

सातारा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटेना झाली असून, प्रत्येक तालुक्‍यातील एक-दोन गावे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागली आहेत. सध्या शिरवळ (ता. खंडाळा) आणि पुनवडी (ता. जावळी) येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी सातारा तालुक्‍यातील जिहे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. आतापर्यंत परदेशातून प्रवास करून आलेली व्यक्ती, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतून प्रवास करून आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित आढळत होत्या. तसेच ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, पण तो कोरोनाबाधित आढळतो, त्याच्यापासून समूह संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. अशी व्यक्ती सापडणे व त्याच्या संपर्काची कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही, असे रुग्ण आता वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात समूह संसर्गाची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे व घरातच थांबून कोरोना संसर्गापासून दूर राहणे इतकीच उपाययोजना आता उरली आहे. 

कोरोनाची लस उपलब्ध झाली असली तरी तिचा कितपत व कोणत्या स्टेजमधील रुग्णांना फायदा होणार, याची निश्‍चित माहिती नाही. काही इंजेक्‍शन्स उपलब्ध झाली असली तरी त्यांचा गंभीर रुग्णांसाठीच वापर होत आहे. तसेच त्या इंजेक्‍शनची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे संसर्गापासून दूर राहणे, हीच उपाययोजना आहे. त्यातच सौम्य किंवा कोणतीच लक्षणे जाणवत नसलेल्या रुग्णांची संख्या सध्या जिल्ह्यात वाढू लागली आहे. त्यामुळे अशा रुग्णांचा संपर्क इतिहास सापडू शकत नसल्याने आरोग्य विभागाची अडचण होत आहे. सध्या विविध हॉस्पिटल्स, कोरोना केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्येही कोरोना बाधितांवर उपचार होत आहेत. 

कोरोना बाधितांची जिल्ह्यातील संख्या दोन हजार 420 वर गेली असून, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार 35 आहे. तर 81 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एक हजार 304 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 541 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून, सर्वाधिक रुग्ण शिरवळ 130, पुनवडी 129 तर जिहे येथे 89 सापडले असून, ही गावे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या... 
तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या अशी : कऱ्हाड 491, सातारा 402, जावळी 295, वाई 275, पाटण 195, खंडाळा 186, फलटण 181, खटाव 130, कोरेगाव 110, माण 81, महाबळेश्‍वर 57. मार्च ते जुलैपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या गावांची तालुकानिहाय संख्या अशी : सातारा 86, जावळी 46, वाई 60, कोरेगाव 40, खंडाळा 20, महाबळेश्‍वर 15, कऱ्हाड 88, खटाव 39, माण 32, पाटण 66, फलटण 49. 

जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेली गावे... 
सातारा : जिहे, कण्हेर, कोडोली 
कोरेगाव : कोरेगाव शहर, वाठार किरोली, नागझरी 
जावळी : पुनवडी, सायगाव 
वाई : सोनगीरवाडी, धर्मपुरी, फुलेनगर 
खंडाळा : शिरवळ 
महाबळेश्‍वर : गोडवली 
कऱ्हाड : तारुख, वनवासमाची, मलकापूर, आगाशिवनगर 
पाटण : कसणी, कोयनानगर, कुंभारगाव 
माण : दहिवडी, गोंदवले बुद्रुक 
फलटण : साखरवाडी, कोळकी, विंचुर्णी 


कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे. आतापर्यंत प्रवास, निकट सहवासीतांमुळे संसर्ग होत होता. आता कोणताही संपर्क नसतानाही काही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाची समूह संसर्गाची सुरवात झाली असे म्हणता येईल. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊन संसर्ग टाळावा. 

- डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT