Satara 
सातारा

रेल्वे स्टेशनलगत साकारणार उड्डाणपूल, बऱ्याच वर्षांची मागणी होणार पूर्ण

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावर मसूर रेल्वे स्टेशननजीकच्या रुळावरून वाहने उड्डाण घेणार आहेत. उड्डाण पुलाच्या कामाची चाचणी सुरू झाल्याने पुलाचे काम मार्गी लागणार आहे. वाहनधारकांसह प्रवाशांची मागणी आता एकदाची पूर्ण होणार आहे. 

मसूर-उंब्रज रस्त्यावरचे रेल्वेगेट ओलांडण्यासाठी वाहनधारक व प्रवाशांची अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी होती. फेब्रुवारीपासून उड्डाणपूल होण्याच्यादृष्टीने रेल्वेकडून रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला जमिनीत होल मारून चाचण्या घेण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले. परिणामी काम ठप्प झाले. आता आठ दिवसांपासून पूर्वेच्या बाजूला मारलेल्या होलवर चाचणी घेतली जात आहे. 
रेल्वे रुळाच्या पूर्वेला मसूर बाजूस एक व पश्‍चिमेस उंब्रज बाजूकडे एक, अशा दोन मशिनद्वारे होल मारण्याचे काम सुरू आहेत. मसूर-उंब्रज रस्त्यावर रेल्वेगेटमधून टोल चुकवणारी वाहने, कारखान्याची ऊस वाहतूक, वडाप करणारी वाहने, पाटण, सातारा, पुणे, कऱ्हाडकडे जाणारी-येणारी वाहने, आसपासच्या गावातून ये-जा करणारी वाहने यामुळे या रस्त्यावर मोठी रहदारी असते. अशातच रेल्वे आल्यानंतर गेट बंद करावे लागते. दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. रेल्वे मार्गस्थ झाल्यानंतर रुळ ओलांडण्यासाठी वाहनांना 30 ते 40 मिनिटे वेळ लागत आहे.

आता या ठिकाणी उड्डाणपूल होत असल्याने वाहतूक कोंडीचा, वेळेचा प्रश्न सुटणार आहे. सद्य:स्थितीत एकच रेल्वे जाण्यासाठी मार्ग आहे. दुहेरी गाडी जाण्याचा मार्ग बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यतः विजेवर रेल्वे सुरू होणार आहे. त्यानुसार उड्डाण पुलाच्या उंची व लांबीनुसार काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वेच्या बाजूस एक होल मारून ते भरून घेतले आहे. त्या होलचे एस आर टेक्‍निकल मुंबई या कंपनीकडून टप्प्याटप्प्याने 875 टनांपर्यंत बोजा ठेवून लोड टेस्टिंग घेतले जात आहे. 

कवठे व कोणेगाव रस्ता सुरक्षित ठेवा 

कवठे व कोणेगाव या दोन गावांना येण्या-जाण्यासाठी रेल्वे रुळाशेजारून रस्ता आहे. आता उड्डाणपूल झाल्यावर या दोन्ही गावांना जास्त अंतर पार करून व वळण घेऊन जावे लागणार आहे. गावाचा रस्ता सुरक्षित ठेवावा, अशी दोन्ही गावच्या ग्रामस्थांची मागणी आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT