Satara 
सातारा

गणरायाला निरोप देताना कातकरी बांधवांना खाऊवाटप; कोरेगाव इनरव्हील क्‍लबचा उपक्रम

संजय शिंदे

सातारा : कोरोनो विषाणूचा संसर्ग सुरू असताना आलेल्या गणरायाला समस्त नागरिक, भाविकांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भावपूर्ण निरोप देताना दुसऱ्या बाजूला कोरेगाव इनरव्हील क्‍लबने कातकरी वस्तीमधील आबालवृद्धांना खाऊवाटप करून त्यांची भूक शमवण्याचा छोटासा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

यंदा कोरोना विषाणूच्या संकटात गणरायाची प्रतिष्ठापना करावी की नको, अशी सर्वांची मन:स्थिती होती. असे असताना सर्वांनी एक पारंपरिक धार्मिक विधी म्हणून का होईना गणरायाला अगदी साध्या पद्धतीने आणून 11 दिवस आपल्या घरात षोडोपचार पद्धतीने पूजा-अर्चा केली. मंगळवारी (ता. एक) अकराव्या दिवशी आता पुढच्या वर्षी उत्साहात येऊन या संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर करून जग सुखी, समृद्ध करा, अशी प्रार्थना करत गणरायाला निरोप देण्यात आला.

सर्वत्र हा निरोप देत असताना येथील इनरव्हील क्‍लबला मात्र गावातील नदीकाठी आपले जीवन व्यथित करणाऱ्या कातकरी समाजाची कणव आली. हा समाज सण, समारंभ यापासून अगदी कोसो दूर असतो. मासेमारी करायची आणि कसे तरी दोन घास खायचे, असे त्यांचे जीवन. गणरायाला निरोप देताना त्यांना आपण दोन घास भरवावेत, त्यांची भूक शमवावी, या हेतूने क्‍लबच्या अध्यक्षा रोहिणी बर्गे, क्‍लबच्या ट्रेझरर नलिनी बर्गे, माजी अध्यक्षा पद्मा भोसले यांनी कातकरी वस्तीत जाऊन तेथील आबालवृद्धांना एकत्र करून त्यांना खाऊचे वाटप केले.

हे करताना त्यांनी जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळण्याचा प्रयत्न केला. तसेच या आबालवृद्धांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, त्याची लागण होणार नाही, यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत अगदी सोप्या आणि त्यांना समजेल, अशा शब्दात मार्गदर्शन केले. कातकरी बांधवांनी खाऊवाटप केल्याबद्दल आपल्या मोडक्‍या तोडक्‍या शब्दात क्‍लबबद्धल कृतज्ञातही व्यक्ती केली. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV New Rules : सरकारची करडी नजर तुमच्या टीव्हीवर! मोफत टीव्ही पाहणे पडेल महागात? TRAIचे नवीन नियम जाणून घ्या

इराणमध्ये घुसून अमेरिकेच्या SEALने पायलटला सुखरुप परत आणलं; भारताकडेही आहे MARCOS, पाकिस्तानला कळणारही नाही की...

Pakistan Petrol Rate : पेट्रोल दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये जनतेचा संताप उसळला; एक लीटरची किंमत ऐकून धक्का बसेल

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

SCROLL FOR NEXT