कोरोना1
कोरोना1 
सातारा

महत्त्‍वाचे... अगदी गरज असेल तरच बॅंकांमध्ये जा

सकाळ वृत्तसेवा

वाई (जि. सातारा) : कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याला रोखण्यासाठी वाई शहरात पालिकेमार्फत सुरुवातीपासूनच आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत; पण मागील आठवड्यात शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानदार व वृद्ध महिला हे कोणताही प्रवासाचा इतिहास नसताना कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या निकट सहवासातील कुटुंबीयांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच ता. एक जुलै रोजी बॅंक ऑफ इंडियाच्या वाई शाखेचे रोखपाल आणि ता. चार जुलैला इतर चार कर्मचारी अशा एकूण पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर यापूर्वीच्या आठवड्यामध्ये बॅंकेत व्यवहारासाठी आलेल्या वाई शहरातील 1200 आणि जवळच्या ग्रामीण भागातील 450 अशा एकूण 1650 व्यक्ती बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कामुळे अतिजोखीम व अल्पजोखमीत आल्या आहेत. 

अशा सर्व व्यक्तींना पालिकेमार्फत फोनद्वारे संपर्क करून अथवा प्रत्यक्ष भेट देऊन होम क्वारंटाइन करण्याचे काम सुरू आहे, तरी यामधील सर्व 55 वर्षांवरील व्यक्ती, दुर्धर व्याधीग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला आणि ज्यांना काही लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्‍तींनी पालिकेच्या आरोग्य विभागाशी किंवा ग्रामीण रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी पोळ यांनी नागरिकांना केले आहे. 

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवार पेठेत मुंबईहून विनापरवाना आलेल्या पाच लोकांना होम क्वारंटाइन करून त्यांच्यावर वाई पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे, तरी नागरिकांनी अशा प्रकारे शहरात विनापरवाना येऊ नये, असेही पोळ यांनी निवेदनात म्हटले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT