Satara 
सातारा

जा कोरोना जा...चा संदेश, जावळीत भात खाचरात तरव्याच्या साह्याने प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (जि. सातारा) : संपूर्ण देशभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सातारा जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या गंभीर पार्श्‍वभूमीवर सनपाणे (ता. जावळी) येथील एका भात उत्पादक शेतकऱ्याने जा कोरोना जा...चा अनोखा संदेश आपल्या भात खाचरातून देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

सनपाणे येथील यशवंत पवार या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतशिवारातील भात खाचरामध्ये भात रोप तरवे टाकून "जा कोरोना परत जा' असा संदेश कोरोना विषाणूची आकृती उभी करत दिलेला आहे. त्यांनी भात खाचरामध्ये तरवे लावताना कोरोना आकृती व जा जा असा संदेश उगवेल असे लावले होते. त्यामुळे उगवलेल्या भात तरव्यांमधून चांगली जनजागृती होत आहे. जावळी तालुक्‍यातील कुडाळ- पाचगणी या रस्त्यालगत असणाऱ्या सनपाणे गावातील भात शेतीमध्ये हे तरवे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आढळू लागले आहेत. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे व स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे. कोरोनाची ही साखळी तोडली गेली पाहिजे, यासाठी अनेक स्तरातून जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये कोरोना जा जा अशी आकृती तरवे टाकत उभारली आहे. भात शेतीतून कोरोनाबाबत केलेल्या जनजागृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

त्यांचं शरीर साथ देत नव्हतं... कसे होते इरफान खान यांचे शेवटचे दिवस; डिझायनर म्हणाली, 'कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी कधीही....

थरारक प्रसंग! आंबेनळी घाटात कार थेट 100 फूट दरीत कोसळली; 10 वर्षांच्या मुलाच्या कॉलमुळे वाचले पाच जणांचे प्राण

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

Ashes Series : २६२ धावा, २० विकेट्स! AUS vs ENG चौथ्या कसोटीत गोलंदाजांची हवा, स्टीव्ह स्मिथचा 'झापूक झूपूक' चेंडूवर दांडा गुल Video

SCROLL FOR NEXT