सातारा

गोंदवल्यात संकटकाळी जपला "श्रीं'चा वारसा 

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले, (जि.सातारा) : कोरोनाच्या संकटकाळी गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी समाधी मंदिर समिती धावून आली. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा वैद्य वारसा जोपासत गोंदवल्यातील सर्वच कुटुंबांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचे वाटप करून काळजी घेतली आहे.
 
दुष्काळ असो वा सांसारिक दुःख असो. गरजू लोकांना हवी असलेली मदत करून दुःख निवारण करण्याचा प्रयत्न श्री महाराज करत. गोंदवल्यातील दुष्काळी परिस्थितीत लोकांसाठी स्वतःच्या शेतात त्यांनी काम उपलब्ध करून दिले होते, तसेच ते रोग्यांवरही औषधोपचार करीत. हा रुग्णसेवेचा वारसा समाधी मंदिर समितीने श्री चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून अखंडितपणे सुरू ठेवला आहे. मोफत उपचार व शस्त्रक्रिया होत असल्याने हे रुग्णालय गरीब व गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. 
गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना विषाणूने जनजीवन विस्कळित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गरजू लोकांना अन्नधान्य देऊन "श्रीं'चा अन्नदानाची परंपरा कायम राखली. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचा शिरकाव झाला आहे. परिणामी आता सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. गोंदवल्यातील लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने मदत करण्याची विनंती समाधी मंदिर समितीला केली. त्यानुसार गोंदवल्यातील अडीच हजार कुटुंबांसाठी अर्सोनिक एल्बम 30 या गोळ्या समाधी मंदिर समितीने उपलब्ध करून दिल्या आहेत. आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून या गोळ्यांचे घरोघरी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
दरम्यान, ग्रामपंचायत सभागृहात समाधी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलेल्या गोळ्यांचा सरपंच अश्विनी कट्टे, डॉ. समिना तांबोळी, उपसरपंच संजय माने, सर्व सदस्य, पोलिस पाटील आशा भोसले, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार यांनी स्वीकार केला.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर समितीकडून गोंदवलेकरांना नेहमीच सहकार्य मिळत असून, सध्याचा आपत्ती काळात केलेली मदत अनमोल आहे. 
- संजय माने, उपसरपंच, गोंदवले बुद्रुक 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT