सातारा

कऱ्हाडला मतमोजणीस प्रारंभ; तासाभरात कळणार गावोगावच्या मतदारांचा काैल

हेमंत पवार

कऱ्हाड :  क-हाड तालुक्‍यातील 87 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 81.23 टक्के मतदान झाले. आज सोमवार (ता. 18) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Gram Panchayat Election Results) प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीलाच सर्व टपाली मतांची मोजणी केली जात आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.
 
तालुक्‍यातील 87 ग्रामपंचायतींसाठी गाव पुढाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. गावची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. मात्र मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याचा फैसला आज (सोमवार) होणार आहे. मतमोजणीची येथील शासकीय धान्य गोदामात व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 34 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या नऊ फेऱ्या होणार आहेत. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्व टपाली मतपत्रिकेंची मोजणी केली जात आहे. ती संबंधित ग्रामपंचातीत विभागली जात आहे. या फेरीनंतर यंत्रावरील मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर सुमारे अकरा पर्यंत मतदारांचा सर्व ग्रामपंचायतींसाठीचा काैल समजेल असा अंदाज बांधला जात आहे.

चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावणा-या एलसीबी ला पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर

त्यामध्ये पहिल्यांदा हजारमाची, निगडी, उंब्रज, खालकरवाडी, शेरे, शेणोली, खुबी, पार्ले व चौगुलेमळा ग्रामपंचायतीची मोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीत सैदापूर, कोपर्डे हवेली, काले, कार्वे, पोतले, पाल आणि शिंदेवादी (विंग). तिसऱ्या फेरीत जखीणवाडी, विंग, गोळेश्वर, बनवडी, कोणेगाव, रिसवड, शिरगाव, चोरे, मरळी. चौथ्या फेरीत इंदोली, हरपळवाडी, शिवडे, भवानवाडी, वडगाव-उंब्रज, तासवडे, वराडे, शहापूर, खराडे, नवीन कवठे, पेरले, भुयाचीवाडी, आबईचीवाडी. पाचव्या फेरीत गायकवाडवाडी, बेलवडे हवेली, वहागाव, खोडशी, तांबवे, चिखली, म्हासोली, शिरवडे, वडोली निळेश्वर, साजूर, भोळेवाडी. सहाव्या फेरीत वस्ती साकुर्डी, कालवडे, गमेवाडी, साकुर्डी, बेलदरे, म्होप्रे, अकाईचीवाडी, नांदलापूर, भरेवाडी, येरवळे, जिंती. सातवी फेरी चचेगाव, ओंड, धोंडेवाडी, नांदगाव, मुंढे, साळशिरंबे, मालखेड, कोळे, कोडोली. आठवी फेरी बामनवाडी, वाठार, बेलवडे बुद्रुक, शेवाळेवाडी (म्हासोली), सवादे, शेवाळेवाडी (उंडाळे), केसे, पाडळी-केसे, वारुंजी, करवडी. नवव्या फेरीत वाघेरी, गोवारे, सुर्ली, घोगाव, गोटेवाडी, घोणशीव, घारेवाडी अशी मतमोजणी होईल. 

छत्रपतींच्या सोन्याच्या सिंहासनासाठी सहकार्य करा - संभाजी भिडे गुरुजी

घोणशी सर्वाधिक, सैदापूर सर्वात कमी 

कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये सर्वच ग्रामपंचायतींत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मतदानाची आकडेवारी वाढून ती 81.23 टक्के झाली. घोणशी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 93.82 टक्के मतदान झाले. सैदापूर येथे 64.97 सर्वात कमी मतदान झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. 

हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT