Satara 
सातारा

हिरव्या कुरणांमुळे मेंढपाळ, पशुपालक सुखावले, माणदेशात पाणीपातळीही उंचावली

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने जमिनीतील पाणीपातळी चांगली उंचावली आहे. माळरानावरील कुरणे हिरव्या गवताने हिरवीगार झाली आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील मेंढपाळ व पशुपालक सुखावले आहेत. माळरानाने जणू हिरवा शालू पांघरला आहे, असे चित्र दिसत आहे. 

तालुक्‍यात गेल्या काही वर्षांत दुष्काळाची परिस्थिती होती. लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना पशुधन संगोपन करणे शेतकऱ्यांना अवघड झाले होते. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली होती. असे असताना पाळीव जनावरांना पिण्याच्या पाण्याबरोबर ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. जमिनीत पाणीच उपलब्ध नसल्यामुळे व कडक उन्हामुळे माळरानावरील चराऊ कुरणे वाळून गेलेली होती. तालुक्‍यातील मेंढपाळ व्यवसाय करणारे पशुपालक संकटात सापडलेले होते. काही मेंढपाळांनी स्थलांतरसुद्धा केले तर काहींनी आपल्या जितराबांना आठवडा बाजार दाखवला, अशी वाईट परिस्थिती ओढवली होती. प्रशासनाने शेतकऱ्यांची जनावरे व मोठे पशुधन गाई व म्हशी वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी पशुधन वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली नव्हती म्हणून मेंढपाळ करणाऱ्या व्यावसायिकांना सधन भागामध्ये स्थलांतर करावे लागले होते. 

यंदा जून महिन्यापासून पावसाने तालुक्‍यामध्ये चांगली हजेरी लावली आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी अडून मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरले आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी उंचावली आहे. यामुळे शेतकरी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या पावसाने माळरानावरील शेळ्या-मेंढ्यांची चराऊ कुरणे फुललेली आहेत. पावसाने तालुक्‍यातील पशुपालकांना एक प्रकारचा दिलासा दिला आहे. माळरानावरील चराऊ कुरणे ही शेळी व मेंढी तसेच पाळीव दुभती जनावरांचे खाद्य म्हणून ओळखली जातात. पावसापूर्वी उन्हाळ्यात चराऊ कुरणे वाळून गेली होती. 
मात्र, पावसानंतर ही कुरणे हिरवीगार झाली असल्याने तालुक्‍यातील मेंढपाळ परमुलकातून स्वघरी आलेले आहेत. यामुळे माळरानावरती शेळ्या-मेंढ्या, म्हशी, गाई आदी जनावरे चरताना दिसत आहेत. 


वरुणराजाने यंदा चांगला दिलासा दिल्यामुळे माणदेशातील मेंढपाळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे शेळी व 
मेंढ्यांना माळरानावरील चराऊ कुरणांच्या माध्यमातून चारा उपलब्ध झाला आहे.'' 

-गुलाब काळेल, मेंढपाळ, वळई 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT