Satara 
सातारा

घाटमाथ्यावर बहरली वृक्षराजी, वन विभागाचे यश

सुहास शिंदे

पुसेसावळी (जि. सातारा) : खटाव आणि कोरेगाव तालुक्‍यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या घाटमाथ्यावर दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत वन विभागाकडून लावण्यात आलेले हजारो वृक्ष सध्या चांगलेच बहरले असून, येत्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनदाट झाडी पाहायला मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी वन विभागाने केलेल्या वृक्षारोपणाच्या प्रयत्नांना चांगले यश आले असून, घाटमाथा आणि पवारवाडी घाटात हे वृक्ष पाहून निसर्गप्रेमी समाधान व्यक्त करत आहेत. 

औंध घाटमाथ्यावर शासकीय दहा हेक्‍टर जागेवर सुमारे सहा ते सात हजार वृक्ष दोन वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत. त्यात चिंच, लिंब, पिंपळ, वड, आपटा, करंज, शिसा, बांबू इत्यादींसह जंगली झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. घाटरस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या या झाडांनी आता चांगलीच उभारी घेतली असून, या झाडांच्या संगोपनासाठी वन विभागाने खूप कष्ट घेतले आहेत. झाडांना भर, खते घालणे, फवारणी करणे त्याबरोबर महत्त्वाचा भाग म्हणजे उन्हाळ्यात चार महिने या झाडांना पाणी दिल्यामुळे आज ही झाडे सात ते आठ फूट उंचीची झाली आहेत.

या झाडांना सर्वात मोठा धोका असतो, तो उन्हाळ्यात वणवा लागण्याचा. मात्र, येथील वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वणवा लागू नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळपट्टा संरक्षण रेखा ओढून या झाडांचा वणव्यापासून बचाव केला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या कष्टाला आणि प्रयत्नांना चांगले यश आले असून, येत्या काही वर्षांत औंध घाटमाथा परिसर निसर्गसौंदर्याने नटणार आहे. 

""दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे आज चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झाडांची चांगल्या प्रकारे देखभाल केली असून, झाडे लावल्यानंतर कुऱ्हाड, चराईबंदी केल्याने झाडे उत्तम स्थितीमध्ये आहेत.'' 
-नवनाथ कोळेकर, वनरक्षक 

""शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी लावलेले वृक्ष आज पाहिल्यावर खूप आनंद होतो. यात वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली असून, या झाडांना उन्हाळ्यात पाणी आणि वणव्यापासून वाचवल्याने आज या ठिकाणी चांगले दृश्‍य दिसत आहे.'' 
-संजय घार्गे, प्रदेशाध्यक्ष, नरेंद्र मोदी विचार मंच (पर्यावरण विभाग) 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT