Satara Half Hill Marathon Sakal
सातारा

Satara Half Hill Marathon: साताऱ्यात मॅरेथॉनला गालबोट; एका धावपटूचा मृत्यू

धावत असतानाच हा धावपटू अचानक खाली कोसळल्यानंतर दहाच मिनिटांत त्याचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्यामध्ये आज हाफ हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये धावताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या राज क्रांतीलाल पटेल (वय 32) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा आज पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरचे राज पटेल हे देखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत धावत असताना पटेल अचानक कोसळले. दहा मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून तपासणीनंतर मृत्यूचं नेमकं कारण कळेल, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

दरवर्षी याच काळात आयोजित करण्यात येणारी ही हिल मॅरेथॉन प्रसिद्ध आहे. यासाठी देशभरातून तसंच परदेशातूनही हौशी धावपटू येत असतात. दरवर्षी शिस्तबद्ध पद्धतीने ही मॅरेथॉन पार पडते. मात्र यंदा या धावपटूच्या मृत्यूने या मॅरेथॉनला गालबोट लागल्याची भावना सहभागी धावपटूंकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT