patan 
सातारा

जळीत कुटुंबाच्या मदतीला धावले हात

सकाळ वृत्तसेवा

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेरे येथील थोरात मळ्यातील आडके वस्तीवरील कमळाबाई राजाराम शिरतोडे यांचे राहते छप्पर आगीत जळून खाक झाले. त्यामध्ये त्यांचा सगळा संसार मातीआड झाला. कोरोनाच्या संकटातच या वृद्ध महिलेवर हे अस्मानी संकट आले. आता पुढे काय? या विवंचनेत सापडलेल्या अवस्थेत त्यांचा मोडलेला संसार उभारण्यासाठी गावकरी पुढे आले आणि काही दिवसातच बेघर झालेली वृद्धा व त्यांच्या मुलाच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटला. गावकऱ्यांकडून आर्थिक बळ मिळाल्याने मोडलेला संसार पुन्हा उभा राहिला. 

कमळाबाई व त्यांचा मुलगा विनायक हे दोघे आडके वस्तीवर छप्परात वास्तव्यास होते. गत महिन्यात 22 मे रोजी रात्री त्यांच्या छप्परास अचानक आग लागल्याने त्यांचा सर्व संसार जळून खाक झाला. कमळाबाई व विनायक यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गावातील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने सोशल मीडियावर त्यांच्या मदतीसाठी गावकऱ्यांना आवाहन केल्यानंतर तत्काळ मदतीचा ओघ सुरू झाला. दोन ते तीन दिवसांत तब्बल 65 हजारांची मदत गोळा झाली. त्यामध्ये गावातील पुण्या-मुंबईतील नोकरदार व काही अज्ञात दानशूरांनी मदतीसाठी हात पुढे केला. शेरे स्टेशन येथील त्रिशूल प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार रुपये किमतीचा संसारपयोगी भांडी संचही दिला. 

जमा झालेल्या मदतीतून माऊली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पक्के शेड उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. कमळाबाईंचे बंधू दाजी आबा मदने यांनी नव्या शेडसाठी स्वतःची जागा दिली. तिथे शेड पूर्णत्वास आले आहे. आठवडाभरापूर्वी जळालेला संसार उभा कसा राहणार, असा यक्ष प्रश्न उद्‌भवल्यानंतर या मायलेकांपुढे पेच निर्माण झाला होता. पण, या अडचणीच्या वेळेस त्यांच्या मागे ग्रामस्थ उभे राहिले. शेरेतील ग्रामस्थांनी शिरतोडे कुटुंबीयांना उभे करण्यासाठी माणुसकी दाखवल्याने त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT