Satara 
सातारा

फिरस्त्या मुंबईकरांमुळे वाढली डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

दहिवडी (जि. सातारा) : येथे व किरकसाल (ता. माण) येथे सोमवारी (ता.15) रात्री कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, हे रुग्ण शोधताना प्रशासनाची तारांबळ उडाली. तर नरवणे येथून पकडून मुंबईला नेण्यात आलेला आरोपीसुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली. त्यातच हा आरोपी दहिवडीत फिरला व थांबला असल्याची माहिती समोर आल्याने दहिवडीकरांची डोकेदुखी वाढली आहे. 

रविवारी (ता. 14) दुपारी चार वाजता एक 60 वर्षीय व्यक्ती खासगी वाहनाने मुंबईहून दहिवडी येथे आपली दोन मुले व एका सुनेसोबत साळुंखे वस्तीवरील आपल्या पाहुण्यांकडे आली. खबरदारीचा उपाय म्हणून शिरवळ येथे त्या वयस्कर व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. रात्री पाहुण्यांकडे मुक्काम करून 15 जून रोजी सकाळी हे सर्वजण मुंबईला निघून गेले. त्या व्यक्तीचा शिरवळ येथे घेतलेल्या स्वॅबचा रिपोर्ट सोमवारी (ता. 15) रोजी रात्री पॉझिटिव्ह आला. ती व्यक्ती दहिवडी येथील नसल्याने पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या सर्वांची त्या व्यक्तीला शोधताना तारांबळ उडाली. अखेर संबंधित व्यक्ती कोणाकडे आली होती, त्याचा तपास लागला. मात्र, एका रात्रीसाठी भेटायला आला अन्‌ त्यांच्यामुळे संपर्कात आलेल्या नऊ जणांना क्वारंटाइन व्हावे लागले. 

नरवणे येथील एक जण मार्च महिन्यात गावी आलेला होता. मात्र, एक व दोन जून रोजी सातारा येथे दवाखान्यात जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने नरवणे येथे आरोग्य उपकेंद्रात औषधे घेतली. पुन्हा त्रास झाल्याने सात जून रोजी दहिवडी येथे येऊन उपचार घेतले. सदर व्यक्ती एका गुन्ह्यातील आरोपी असल्याने नवी मुंबई पोलिस त्याला शोधण्यासाठी 11 जून रोजी माण तालुक्‍यात आले होते. दहिवडी पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्याच दिवशी मुंबईला नेण्यात आले. मुंबई येथे त्याचा स्वॅब घेतल्यावर 15 जून रोजी रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील नरवणे येथील सात व दहिवडी येथील पाच जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे दहिवडीकरांची कसलीही चूक नसताना फक्त फिरस्त्या मुंबईकरांमुळे दहिवडीकरांची डोकेदुखी वाढली असून, नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. 


नरवणे ग्रामस्थांचीही वाढली चिंता 

दरम्यान, नरवणे (ता. माण) येथील कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीची आई अंगणवाडी सेविका आहे. त्यामुळे संपूर्ण नरवणे ग्रामस्थांची चिंता वाढलेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT