farmer sakal
सातारा

Satara : भरपाईच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा ; अतिवृष्टी बाधितांना सतरा कोटींची मदत

२४ हजार ७५४ शेतकऱ्यांना लाभ

सकाळ वृत्तसेवा

सातारा : गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील २४ हजार ७५४ शेतकऱ्यांना १७ कोटी चार लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षातील सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती. यात खरीप पिकांसह नगदी पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतातील पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले होते. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.

या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठविले होते. मात्र, पाच ते सहा महिने उलटले तरी याबाबत कोणतीही मदत मिळाली नव्हती. याबाबत दै. ‘सकाळ’ने जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.

भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. याची दखल घेऊन शासनाने तब्बल पाच ते सहा महिन्यांनी पुणे व नाशिक विभागांतील सहा लाख ३२ हजार ८९२ शेतकऱ्यांना तब्बल ६७५ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये तीन हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २७ हजार व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६ हजार रुपये या वाढीव दराप्रमाणे देण्यात येणार आहे.

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील एक लाख ९४ हजार ५५० शेतकऱ्यांच्या एक लाख एक हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २१६ कोटी ४६ लाख एक हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील २४ हजार ७५४ शेतकऱ्यांना १७ कोटी चार लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वाढीव दराने मिळणार मदत...

यापूर्वी जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसान भरपाईची रक्कम मिळत होती, तर वाढीव दराने १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, तर वाढीव दराने २७ हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी १८ हजार, तर वाढीव दराने ३६ हजार रुपये मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : तारळी धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT