Satara 
सातारा

भर उन्हातील मदतकार्याने वाचला "तिचा' जीव!

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले (जि. सातारा) : भर दुपारची वेळ...अंगाची काहिली होणाऱ्या रणरणत्या उन्हात रस्त्यावर निपचितपणे पडलेला एक पक्षी दिसताच भरधाव गाडीला कचकन "ब्रेक' लावला अन्‌ "ते' तिथे पोचले. त्या पक्ष्यात अजून धाकधूक होती. पाणी पाजताच तरतरी आली. मग हा पक्षी वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. अखेर या पक्ष्याला जीवदान मिळाले. तो पक्षी होता लांडोर. तासाभरात धैर्यशील पाटील यांनी केलेल्या धडपडीला अखेर यश मिळाले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन सुरू केला आणि प्रदूषणालाही काही काळ "बाय' म्हणावे लागले. अर्थातच विविध प्रकारचे प्रदूषण कमी झाल्यामुळे निसर्गाची विविध रूपे लोकांना सहज अनुभवायला मिळू लागली आहेत. अनेक वर्षांनंतर पक्ष्यांची किलबिल ऐकून अनेकांचे मन प्रसन्नही झाले. मात्र, भर दुपारच्या वेळी सातारा- पंढरपूर रस्त्यावरील लोधवडे (ता. माण) गावाजवळ एक लांडोर जखमी अवस्थेत रस्त्यालगत पडलेली पाहायला मिळाली.

रस्त्यावर वाहतूक होती; परंतु अंतिम घटका मोजणाऱ्या या पक्ष्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते आणि लक्ष गेले तरी कुणी थांबायला तयार नव्हते. मात्र, यादरम्यान कामानिमित्त म्हसवडकडे निघालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नजरेस हा पक्षी पडला अन्‌ वेगात चाललेल्या गाडीला त्यांनी लगेच "ब्रेक' लावला. थोडीशी धाकधूक असली, तरी निपचित पडलेल्या लांडोरीला त्यांनी तातडीने पाणी पाजले. तशी तिच्यात आणखी थोडी तरतरी जाणवली. लागलीच प्रथमोपचार करून तिचा जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली. 

एका जीवासाठी त्यांनी हातातील कामही सोडले आणि पुन्हा "यू टर्न' घेत थेट दहिवडी गाठली. काही मिनिटांत वन विभागात पोचल्यामुळे पक्ष्याला पुढील उपचारही तत्काळ मिळाले आणि धोका टळला. एक पक्षी वाचविण्यासाठी केलेल्या धडपडीला अखेर यश मिळाल्याने श्री. पाटील व त्यांना सहकार्य करणाऱ्या चित्रसेन मुके व सागर कट्टे याचेही चेहरे समाधानाने खुलले. 

""आपल्या राष्ट्रीय पक्ष्याची मादी असणाऱ्या लांडोरचा जीव वाचविण्यात मला योगदान देता आले याचे खूप समाधान मिळत आहे.'' 

- धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT