OBC  sakal
सातारा

सातारा : OBC च्या जनगणनेसाठी एल्गार

कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे; वंचित आघाडीतर्फे निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे आज येथील तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी जातनिहाय जनगणना करावी, वाढती महागाई रोखावी, सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली भर उन्हात धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाची तातडीने जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात केंद्र सरकारला ठराव द्यावा, वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जीवनमान कोलमडल्यामुळे महागाई कमी करण्यासाठी तातडीने उचित पावले उचलावीत, सच्चर समिती शिफारशींची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे पदोन्नतीमधील अडकलेले आरक्षण तातडीने सुरू करावे, भटके विमुक्तांच्या सवलती तातडीने सुरू कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देऊन पूर्ततेसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

धरणे आंदोलनस्थळी श्री. खंडाईत, सुहास पुजारी, सुनील कदम, सुभाषराव गायकवाड, सुरेश गायकवाड, संजय कर्पे, दादासाहेब केंगार, बाळकृष्ण देसाई, सचिन भंडलकर, नितीन भोसले यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनासाठी आघाडीचे तालुका महासचिव विजयराव मोरे, बाबा आवाड, लक्ष्मण वाघमारे, निसार खान, शंकर खंडाईत यांनी परीश्रम घेतले. या वेळी निवृत्ती सोनवणे, सुधाकर जगताप, अधिक जगताप, जगन्नाथ वाघमारे, सुनील बडेकर, नाना बडेकर, लक्ष्मण आवडे, रफिक मुलाणी, चंद्रकांत कांबळे, सचिन जाधव, प्रल्हाद कदम, मारुती चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT