Satara 
सातारा

कऱ्हाडला कोरोनाबाधितांवर घरच्या घरीच उपचार!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील दाट वस्तीसह उपनगरांत वाढणारा कोरोना लक्षात घेऊन पालिकेतर्फे होम आयसोलेट यंत्रणा राबविली जाणार आहे. कोविडसाठी 24 तास कोविड हेल्पलाइनचीही व्यवस्था पालिकेने केली आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पुढाकार घेतला आहे. होम आयसोलेशनची यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वितसाठी शहरातील काही तज्ज्ञ डॉक्‍टरांशी चर्चा केलेली आहे. डॉक्‍टर पॅनेलच्या स्थापनेनंतर पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पालिका होम आयसोलेट यंत्रणा राबविणार आहे. अधिक त्रास झाल्यास संबंधित रुग्णास रुग्णालयांत हलविण्यात येणार आहे. 

शहरात कोविडवर नियंत्रणासाठी पालिका व नागरी आरोग्य केंद्र तारेवरची कसरत करत आहे. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला ऍण्टीजेन्स चाचणीची परवानगी दिली जाणार आहे. आरोग्य केंद्राला सुविधांसह मनुष्यबळ दिले जाणार आहे. प्राथमिक तपासणी झाल्यास लक्षणे नसणाऱ्यांना नॉन कोविड असे सर्टिफिकेटही पालिका देणार आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णालयात संबंधितांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. शहरातील हॉस्पिटल्सना हॉटेलच्या रूम देता येतील का, याचाही पालिका विचार करत आहे. पीपीई किटसाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यामातून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही त्याची मागणी कळवली आहे.

शहरात सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या 83 वर गेली आहे. एकदम 13 रुग्ण काल रात्री वाढले. त्यात अती सहवासातील नऊ, तर चौघे नवीन रुग्ण आहेत. त्यामुळे शहरातील कोविड रुग्णसंख्या शंभरीकडे निघालेली आहे. ती स्थिती लक्षात घेऊन पालिका होम आयसोलेशनची सुविधा सुरू करणार आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याची पालिकेची सर्व तयारी पूर्ण आहे. जे काही रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ज्यांना सिमटर्म नसतील अशा रुग्णांची व्यवस्था घरीच करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी त्या संबंधितांकडे घरी जागा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना घरी राहुन उपचार घेता येतील. त्यासाठी पालिका डॉक्‍टर पॅनेल तयार करत आहे. त्यावर तज्ज्ञ डॉक्‍टरांना घेऊन घरपोच उपचाराची व्यवस्था करता येईल. 

24 तास हेल्पलाइन सुरू 

पालिकेने कोविडचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन 24 तास कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याचा क्रमांक 1800233011111 असा आहे. त्या हेल्पलाइनवर फोन केल्यास कोरोनाची सध्याच्या स्थितीची सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय शहरात कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत. याचाही माहिती दिली जाणार आहे, असे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT